जळगाव - शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. या समस्येमुळे महापालिकेविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संताप व्यक्त केला. तर जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.
जळगावातील रस्त्यांचा विषय ऐरणीवर; काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा! - congress party
रस्ते दुरुस्तीची मागणी करून देखील महापालिका प्रशासन काहीही हालचाल करत नसल्याने, बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आमदार भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी 'चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची' या मथळ्याखाली शहरभर फलक लावले होते. याच फलकांचा आधार घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भोळेंविरुद्ध घोषणाबाजी केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले लक्षवेधी आंदोलन
जळगाव - शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. या समस्येमुळे महापालिकेविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संताप व्यक्त केला. तर जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.
वकील संघ व रोटरी क्लबचेही निवेदन-
शहरातील रस्त्यांच्या विषयासंदर्भात जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेतली. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

Intro:जळगाव
शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. या समस्येमुळे महापालिकेविरुद्ध जनक्षोभ वाढत आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संताप व्यक्त केला. तर जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन रस्ते दुरुस्तीची मागणी केली.Body:अमृत पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनिल बोरोले व उज्ज्वल सोनवणे या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासनाविरुद्ध जनक्षोभ वाढू लागला आहे. रस्ते दुरुस्तीची मागणी करून देखील महापालिका प्रशासन काहीही हालचाल करत नसल्याने बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनापासून महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती सतरा मजली इमारतीसमोर आणली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांना लक्ष करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. मागील निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आमदार भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी 'चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची' या मथळ्याखाली शहरभर बॅनर लावले होते. याच बॅनरचा आधार घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भोळेंविरुद्ध घोषणाबाजी केली. महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच बोरोले व सोनवणे यांचा जीव गेला आहे. त्यामुळे महापालिका व सत्ताधाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसात केली नाही तर महापालिकेवर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.Conclusion:वकील संघ व रोटरी क्लबचेही निवेदन-
शहरातील रस्त्यांच्या विषयासंदर्भात जळगाव जिल्हा वकील संघ तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेतली. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करत आयुक्तांना निवेदन देण्यात आले.