ETV Bharat / state

जळगावच्या प्रणित पाटीलला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर - Pranit Patil jalgaon news

घरात शिरलेल्या चोरट्याशी झुंज दिल्याबद्दल प्रणित पाटीलला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Pranit Patil
प्रणित पाटील
author img

By

Published : Feb 17, 2021, 3:10 PM IST

Updated : Feb 17, 2021, 3:28 PM IST

जळगाव - चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांशी मोठ्या हिंमतीने दोन हात करत आपल्या आईचा जीव वाचवणाऱ्या १२ वर्षीय प्रिन्स उर्फ प्रणित नितीन पाटील (रा. चोपडा, जि. जळगाव) या बालकाला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य बाल आयोग कार्यालयातून पाटील कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रणित पाटील हा पंकज ग्लोबल शाळेचा विद्यार्थी आहे.

काय घडली होती घटना?

प्रणितचे वडील नितीन रामभाऊ पाटील हे अभियंता व संस्थाचालक आहेत. तर आई वैशाली गॅस एजन्सीचा कारभार पाहतात. पाटील कुटुंब चोपडा येथील ओम साई अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या वर्षी नितीन पाटील हे घरी नसताना दुपारच्या सुमारास एक अनोळखी महिला आणि एका पुरुषाने लूटमार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात प्रवेश केला. मिरचीचा स्प्रे प्रणितची आई वैशाली हिच्या तोंडावर मारला. वैशाली पाटील यांनी चोराची कॉलर पकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने त्यांना मारहाण करत ढकलून दिले. याच वेळी अवघ्या १२ वर्षांच्या प्रणितने चोरट्याचा पाय घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे त्याला पळता येत नव्हते. बराच वेळ प्रणितने त्याला घट्ट पकडून ठेवले. त्या दरम्यान, घरातील काम करणाऱ्या लताबाईने गॅलरीत जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रणितने धाडस केल्याने वैशाली पाटील यांचे प्राण वाचले होते आणि घरात चोरीची घटना टळली होती.

प्रणितच्या धाडसाचे झाले होते कौतुक-

प्रणितच्या या धाडसाचे कौतुक झाले आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सुचवले होते. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मंगळवारी राज्य बाल आयोग कार्यालयातून अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फोनवरून प्रणितला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचे पाटील कुटुंबीयांना सांगितले. प्रणितची निवड राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कारासाठी झाल्याची माहिती त्याचे वडील नितीन पाटील यांनी दिली आहे.

बाल शौर्य पुरस्कार मिळवणारा जिल्ह्यातील दुसरा सुपूत्र-

प्रणित याच्या आधीही जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील नीलेश भील याची राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली होती. नीलेश याने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या बालकांचा जीव वाचवला होता. त्यानंतर आता प्रणित याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा - भोर पोलीस कोठडीतून दोन आरोपींचे पलायन; खिडकीचे गज कापून पोबारा

Last Updated : Feb 17, 2021, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.