जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळ असून या कार्यात त्यांना मंगळच आडवा येत असल्याची भावना काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. भारतात अंमळनेर व कोलकता या दोनच ठिकाणी मंगळग्रह देवाची मंदिरे आहेत. अमळनेरातील मंगळदेव ग्रह मंदिरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावा यासाठी अभिषेक घालण्यात आला. आमदार स्मिता वाघ व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीसच 'मुख्यमंत्री' होतील - नितीन गडकरी
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश मिळाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मात्र, सत्ता वाटपावरून युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा नेतृत्व करता यावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
हेही वाचा... आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत अनवाणी राहणार... मुस्लीम शिवसैनिकांची मन्नत