ETV Bharat / state

जळगाव ग्रामीण मतदारसंघ: घरकुल घोटाळा उघडला अन् दोन 'गुलाबां'चा संघर्ष टळला! - जळगाव ग्रामीण मतदारसंघात सेनेचे पारडे जड

जळगाव ग्रामीण मतदारसंघात सेनेचे पारडे जड आहे तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर देवकरांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने राष्ट्रवादीवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर
author img

By

Published : Sep 19, 2019, 6:17 PM IST

Updated : Sep 19, 2019, 10:45 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाची निवडणूक म्हटले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांची नावे डोळ्यासमोर येतात. गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीपासून या मतदारसंघाचे राजकारण या दोन्ही नेत्यांभोवतीच फिरत आहे. यावेळी युतीकडून गुलाबराव पाटील तर आघाडीकडून गुलाबराव देवकर प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर देवकरांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ते पुन्हा तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, सत्तेत मंत्रिपद आणि भाजपसोबत होणारी युती ही शिवसेनेच्या गुलाबरावांसाठी जमेची बाजू ठरणार आहेत.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव व धरणगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. मागील 2 पंचवार्षिकपासून या मतदारसंघाला राज्यमंत्री पद मिळत आहे. सन 2009 मध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना पराभूत करुन प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह परिवहन राज्यमंत्री पद बहाल करण्यात आले होते. मात्र, मंत्री पदी कार्यरत असतानाच तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात देवकर यांना तुरुंगात जावे लागले होते. विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरल्याने देवकर यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर 2014 ची विधानसभा निवडणूक देवकरांना तुरुंगातून लढवावी लागली. त्यावेळी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी देवकरांना पराभूत केले. यावेळी देखील गुलाबराव पाटलांच्या रुपाने जळगाव ग्रामीण मतदारसंघाला मंत्री पद मिळाले. भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने गुलाबराव पाटलांना सहकार राज्यमंत्री पद मिळाले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघ आढावा

हेही वाचा - शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?

देवकरांना शह देण्यात यशस्वी झालेल्या गुलाबराव पाटलांनी गेल्या 5 वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघावर आपली पकड निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र, मतदारसंघातील काही महत्त्वाचे प्रश्न कायम असल्याने पाटलांवर मतदारांची नाराजी कायम आहे. त्यांची ही कमकुवत बाजू उचलून धरत देवकरांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, घरकुल घोटाळ्याचा निकाल लागून देवकरांना शिक्षा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. देवकर अडचणीत आल्याने पाटलांच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. भाजप आणि सेनेत युती झाली तर पाटील हेच भावी आमदार असतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र, युती फिस्कटली तर पाटलांच्या समोर भाजपच्या उमेदवाराचे प्रमुख आव्हान असणार आहे. भाजप याठिकाणी एखादा मातब्बर उमेदवार आयात करुन पाटलांसमोर उभा करू शकतो.

देवकर यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव मतदारसंघातून लढविली होती. पण त्यांना यश आले नाही. लोकसभेनंतर आता पुन्हा ते विधानसभेची तयारी करीत होते. नेमकं याच वेळी घरकुल घोटाळ्याचा निकाल लागून त्यांना 4 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याने ते पुन्हा कारागृहात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला या मतदासंघातून देवकरांपेक्षा 64 हजार 711 इतके मताधिक्य मिळाले आहे. तसेच यावेळी भाजप-सेना युती होण्याचे संकेत असल्याने सध्या तरी या मतदारसंघात सेनेचे पारडे जड आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तर भाजप-शिवसेनेसोबत असल्याने या मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी अशीच सरळ लढत होण्याची शक्यता आहे. घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने देवकरांना निवडणूक लढवता येणार की नाही, हा प्रश्न असल्याने आता या लढतीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर बहुतांश समीकरणे अवलंबून आहेत.

हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा: विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?

हे प्रलंबित विषय ठरतील निर्णायक

जळगाव तालुक्यातील पाणी टंचाई, धरणगाव शहराच्या समस्या, गिरणा नदीवरील बलून बंधारे, रखडलेला शेळगाव बॅरेज प्रकल्प, रस्ते, पूल यासह जळगाव तालुक्यातील आसोदा येथील कवयित्री बहिणाबाई यांचे तर धरणगाव येथील बालकवी यांचे अपूर्णावस्थेतील स्मारक, रोजगार हे विषय आताच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरणारे आहेत.

हे असतील संभाव्य उमेदवार

शिवसेनेतर्फे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेच एकमेव इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांना शिक्षा झाल्याने त्यांची उमेदवारी तळ्यात मळ्यात आहे. राष्ट्रवादीने देवकरांना पर्यायी उमेदवार म्हणून दुसरा उमेदवार देण्याचे ठरवले तर राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे भाजप आणि सेनेत युती झाली नाही तर भाजपतर्फे पी. सी. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, जिल्हा परिषद सभापती प्रभाकर सोनवणे हे इच्छुक उमेदवार आहेत.

हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?

मतदारांची आकडेवारी

पुरुष - 1 लाख 63 हजार 115
महिला - 1 लाख 49 हजार 504
एकूण - 3 लाख 12 हजार 621

मागील निवडणुकीतील मते

गुलाबराव पाटील (शिवसेना) - 84,020
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) - 52,653
पी. सी. पाटील (भाजप) - 44,011

हेही वाचा - धुळे ग्रामीण विधानसभा आढावा : कुणाल पाटील राखणार गड?

लोकसभेचे मताधिक्य

भाजप - 1,21,742
राष्ट्रवादी - 57,024
मताधिक्य - 64,718

Intro:जळगाव
जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हटला की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांची नावे डोळ्यासमोर येतात. गेल्या दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघाचे राजकारण या दोन्ही नेत्यांभोवतीच फिरत राहिले आहे. यावेळी युतीकडून गुलाबराव पाटील तर आघाडीकडून गुलाबराव देवकर प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर देवकरांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ते पुन्हा तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, सत्तेत मंत्रिपद आणि भाजपसोबत होणारी युती ही शिवसेनेच्या गुलाबरावांसाठी जमेची बाजू ठरणार आहेत.Body:जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव व धरणगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. मागील दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघाला राज्यमंत्रीपद मिळत आहे. सन २००९ मध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना पराभूत करुन प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह परिवहन राज्यमंत्री पद बहाल करण्यात आले होते. मात्र, मंत्रिपदी कार्यरत असतानाच तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात देवकर यांना तुरुंगात जावे लागले होते. विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरल्याने गुलाबराव देवकर यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर सन २०१४ ची विधानसभा निवडणूक देवकरांना तुरुंगातून लढवावी लागली. त्यावेळी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी देवकरांना पराभूत केले. यावेळी देखील गुलाबराव पाटलांच्या रूपाने जळगाव ग्रामीण मतदारसंघाला मंत्रिपद मिळाले. भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने गुलाबराव पाटलांना सहकार राज्यमंत्री पद मिळाले. देवकरांना शह देण्यात यशस्वी झालेल्या गुलाबराव पाटलांनी गेल्या पाच वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघावर आपली पकड निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र, मतदारसंघातील काही महत्त्वाचे प्रश्न कायम असल्याने पाटलांवर मतदारांची नाराजी कायम आहे. त्यांची ही कमकुवत बाजू उचलून धरत देवकरांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, घरकुल घोटाळ्याचा निकाल लागून देवकरांना शिक्षा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. देवकर अडचणीत आल्याने गुलाबराव पाटलांच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. भाजप आणि सेनेत युती झाली तर पाटील हेच भावी आमदार असतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र, युती फिस्कटली तर गुलाबराव पाटलांच्या समोर भाजपच्या उमेदवाराचे प्रमुख आव्हान असणार आहे. भाजप याठिकाणी एखादा मातब्बर उमेदवार आयात करू पाटलांसमोर उभा करू शकतो.

गुलाबराव देवकर यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव मतदारसंघातून लढविली होती. पण त्यांना यश आले नाही. लोकसभेनंतर आता पुन्हा ते विधानसभेची तयारी करीत होते. नेमकं याच वेळी घरकुल घोटाळ्याचा निकाल लागून त्यांना ४ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याने ते पुन्हा कारागृहात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला या मतदासंघातून देवकरांपेक्षा ६४ हजार ७११ इतके मताधिक्य मिळाले आहे. तसेच यावेळी भाजप-सेना युती होण्याचे संकेत असल्याने सध्या तरी या मतदारसंघात सेनेचे पारडे जड आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत तर भाजप शिवसेनेसोबत असल्याने या मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी अशीच सरळ लढत होण्याची शक्यता आहे. घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने देवकरांना निवडणूक लढविता येणार की नाही, हा प्रश्न असल्याने आता या लढतीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर बहुतांश समीकरणे अवलंबून आहेत.

हे प्रलंबित विषय ठरतील निर्णायक-

जळगाव तालुक्यातील पाणी टंचाई, धरणगाव शहराच्या समस्या, गिरणा नदीवरील बलून बंधारे, रखडलेला शेळगाव बॅरेज प्रकल्प, रस्ते, पूल यासह जळगाव तालुक्यातील आसोदा येथील कवयित्री बहिणाबाई यांचे तर धरणगाव येथील बालकवी यांचे अपूर्णावस्थेतील स्मारक, रोजगार हे विषय आताच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरणारे आहेत.

हे असतील संभाव्य उमेदवार-

शिवसेनेतर्फे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेच एकमेव इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांना शिक्षा झाल्याने त्यांची उमेदवारी तळ्यात मळ्यात आहे. राष्ट्रवादीने देवकरांना पर्यायी उमेदवार म्हणून दुसरा उमेदवार देण्याचे ठरवले तर राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे भाजप आणि सेनेत युती झाली नाही तर भाजपतर्फे पी. सी. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, जिल्हा परिषद सभापती प्रभाकर सोनवणे हे इच्छुक उमेदवार आहेत.Conclusion:मतदारांची आकडेवारी अशी-

पुरुष : १ लाख ६३ हजार ११५
महिला : १ लाख ४९ हजार ५०४
एकूण : ३ लाख १२ हजार ६२१

मागील निवडणुकीतील मते-

१) गुलाबराव पाटील : (शिवसेना) ८४,०२०
२) गुलाबराव देवकर : (राष्ट्रवादी) ५२,६५३
३) पी. सी. पाटील : (भाजप) ४४,०११

लोकसभेचे मताधिक्य

भाजप : १,२१,७४२
राष्ट्रवादी : ५७,०२४
मताधिक्य : ६४,७१८
Last Updated : Sep 19, 2019, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.