ETV Bharat / state

जळगावातील 'नो व्हेईकल झोन' अखेर झाला रद्द; निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी - नो व्हेईकल झोन रद्द

लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी नियंत्रित करण्यासाठी जळगावात गर्दी होणाऱ्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ आखण्यात आले होते. मात्र, नियोजनाअभावी प्रशासनाचा हा निर्णय फसला होता. नो व्हेईकल झोन सोमवारपासून बंद करण्यात येतील. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोना रुग्णांसाठी देखील नवीन नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

no vehicle zone cancelled in jalgaon
जळगावातील 'नो व्हेईकल झोन' रद्द
author img

By

Published : Jul 26, 2020, 1:11 PM IST

जळगाव-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने स्थानिक प्रशासनाने 7 ते 13 जुलै दरम्यान, जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेरात लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी नियंत्रित करण्यासाठी जळगावात गर्दी होणाऱ्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ आखण्यात आले होते. मात्र, नियोजनाअभावी प्रशासनाचा हा निर्णय फसला होता. शहरात प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने अखेर नो व्हेईकल झोन बंद करण्यात आले असून, सोमवार (27 जुलै) हे झोन नसणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ, अमळनेर या नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लॉकडाऊनची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने केली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 14 जुलैपासून अनलॉक करण्यात आले. मात्र बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेत वाहनांची गर्दी कमी झाली. पण एकाच मार्गावर वाहनांची गर्दी वाढली. नो व्हेईकल झोनमध्ये पत्रे लावून रस्ते अडविले गेले. नागरिकांनी आपल्या घरी जाताना वाहन नेमके कोठून न्यायचे असा प्रश्‍न पडत होता, कारण पत्रे पॅक होते. काहीजणांनी दुसऱ्या लांबच्या अंतराने जाणे पसंत केले. काहींना तर चक्क तेथील रहिवासी आहोत, याचा पुरावा जवळ बाळगावा लागला. नागरिकांनी हा त्रासही सहन केला. याबाबत तक्रारी वाढल्याने अखेर हा निर्णय प्रशासनाला मागे घ्यावा लागला आहे.

कोरोनाबाधितांसाठीही नवा आदेश-

जिल्ह्यात कोरोनोबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अनेकांना सौम्य लक्षणे असतात किंवा नसतात. मात्र त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह येतो. अशा रुग्णांना आता कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये डेडीकेटेड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही. त्यांना आता घरीच उपचार घेण्यासाठी परवानगी देता येणार आहे. मात्र, ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे व त्यांना विविध व्याधी आहेत. अशांना मात्र घरी उपचारासाठी परवानगी नसेल.

उपचार घेणाऱ्यांना स्वतःच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावांचा व संबंधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या शिफारशीसह हमी पत्र द्यावे लागेल. घरी उपचार घेण्यासाठी स्वतंत्र रूम असावी. एकच कुटुंब त्यांच्या घरात राहत असावे. स्वतंत्र बाथरूम, शौचालय असावे. याची खातरजमा तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवकांनी करावी. तसा अहवाल महापालिका क्षेत्रात आयुक्त, तहसीलदार किंवा इंसीडेंट कमांडर यांना सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.