ETV Bharat / state

Jalna Police पोलीस अधिकार्‍याच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता; संभाजी सेनेने दिला इशारा - Likely Arise Due Statement

Jalna Police जळगाव पोलिस ( Jalgaon Police ) अधिकाऱ्याच्या कथित ओडिओ क्लिप नंतर जालन्यातील विभागीय पोलिस अधिकाऱ्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल ( Video clip viral )होत आहे. यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता आहे.

Jalna Police
Jalna Police
author img

By

Published : Sep 21, 2022, 6:50 PM IST

जालना जळगाव पोलिस ( Jalgaon Police ) अधिकाऱ्याच्या कथित ओडिओ क्लिप नंतर जालन्यातील विभागीय पोलिस अधिकाऱ्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल ( Video clip viral )होत आहे. यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल परतूर तालुक्यातील आष्टी गावातील सामाजिक सभागृहाच्या वादातून ग्रामपंचयात कार्यालयात सामजिक कार्यकर्ते आणि ग्रामसेवक यांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून ग्रामसेवक यांच्याकडून आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या विरुद्ध सामजिक कार्यकर्त्यांकडून ग्रामसेवक यांच्या विरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी एका सामाजिक संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. याच्या कार्यक्रम दरम्यान व्यासपीठावर जाऊन विभागीय पोलिस अधिकारी मोरे यांनी केलेल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास या अधिकाऱ्याकडून काढून घेऊन निष्पक्ष अधिकाऱ्याकडून करावा, अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

व्हिडीओमुळे खळबळ आंदोलनाच्या दरम्यान विभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी तहसीलदार यांच्या उपस्थितीत या सामजिक संघटनेच्या व्यासपीठावर जाऊन आपल्या विशिष्ट धर्माचा उल्लेख करत. छाती ठोक पणे आपल्या जातीचा उल्लेख करत मी कट्टर आहे. समाजातील लोकांना छेडणाऱ्याला आपण कदापिही सोडणार नाही, असे वक्तव्य करणारी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकार्‍याच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता

संभाजी सेनेने दिला इशारा त्यामुळे आता या प्रकरणी ग्रामसेवक यांच्यावर दाखल झालेल्या अँट्रॉसिटीच्या गुन्हाचा तपास या अधिकाऱ्याकडून काढून घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तशा प्रकारच्या मागणीचा निवेदन देखील संभाजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब शिरसाठ यांनी विभागीय पोलिस आयुक्त औरंगाबाद यांना दिले आहे. तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.