ETV Bharat / state

घाणेरड्या पद्धतीचे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे - खासदार सुप्रिया सुळे

author img

By

Published : May 21, 2022, 2:25 PM IST

राज्यात केतकी चितळे असो कि नवनीत राणा यासह विविध विषयावरून सद्यस्थितीत ते राजकारण सुरू आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे असे म्हणतानाच हे सर्व थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील मध्यस्थी करेन , मी सर्वांशी बोलायला तयार आहे. या शब्दात राज्यात सुरु असलेल्या सुरू असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

mp supriya sule say in jalgaon dirty politics should stop somewhere
घाणेरड्या पद्धतीचे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे - खासदार सुप्रिया सुळे

जळगाव - भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रपतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असा आरोप होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावरही अंडी फेकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. असे बोलणे अत्यंत वाईटच असल्याने यावर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी निषेधाची भूमिका नोंदवली होती. याबद्दल मी त्यांचे आभारही मानले होते. घाणेरडे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घ्यायला तयार आहे. तसेच प्रत्येक पक्षातील नेत्यांशी बोलायला तयार आहे. मात्र हे कुठेतरी थांबला पाहिजे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

महागाईची प्रतीकात्मक अंत्ययात्रा - राज्यात पेट्रोलचे डिझेल गॅसचे दर हे गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावातील आकाशवाणी चौकातुन तिरडीवर जीवनावश्यक वस्तू ठेवत महागाईची यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढत व गोंधळाच्या माध्यमातून याप्रसंगी राष्ट्रवादी तर्फे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर माजी मंत्री एकनाथ खडसेंसह राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंद चारचाकीला दोर बांधुन गाडी ओढुन पेट्रोल दर वाढिचा निषेध केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

घाणेरड्या पद्धतीचे राजकारण - राज्यात केतकी चितळे असो कि नवनीत राणा यासह विविध विषयावरून सद्यस्थितीत ते राजकारण सुरू आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे असे म्हणतानाच हे सर्व थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन व भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील मध्यस्थी करेन , मी सर्वांशी बोलायला तयार आहे. या शब्दात राज्यात सुरु असलेल्या सुरू असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या पेट्रोल डिझेल भाव वाढीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर - पेट्रोल डिझेल भाव वाढीबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये बोलताना म्हटले होते की, पेट्रोल डिझेल भाववाढ मागे राज्याचा टॅक्स हा जास्त आहे. त्यामुळेच राज्यात पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले आहे. गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांचा राष्ट्रीय स्तरावर खूप अभ्यास असून ते अभ्यासू व्यक्ती आहे. त्यांना राष्ट्रीय व जागतिक स्तराचा जास्त अभ्यास असून ते अभ्यासू व्यक्ती आहे, असे ते म्हणू शकतात असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.