ETV Bharat / state

सावद्यात पूर्ववैमनस्यातून 50 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या - जळगाव खून बातमी

तीन अज्ञात व्यक्तींनी एका 50 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरातील ख्वाजा नगरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Aug 20, 2020, 10:50 PM IST

जळगाव - तीन अज्ञात व्यक्तींनी एका 50 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरातील ख्वाजा नगरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (वय 50 वर्षे, रा. सावदा), असे मयताचे नाव आहे. शहरातील मरिमाता मंदिर परिसरातील मागील बाजूस असलेल्या ख्वाजा नगरच्या गेटसमोर ही घटना घडली. रईस दंगा हे येथील एका किराणा दुकानाजवळील बखळ जागेत बसलेले होते. तीन संशयितांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केले. त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यात दंगा यांचा जागीच मृत्यू झाला. दंगा यांच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

सावदा शहरातील हत्येची घटना कळताच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार रवींद्र मोरे, संजय चौधरी करत आहेत.

हेही वाचा - गणेशोत्सव काही तासांवर; कोरोनामुळे जळगावातील बाजारपेठ मात्र शांतच-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.