ETV Bharat / state

धरणगाव येथे 23 लाख 33 हजारांचा गुटखा जप्त; 'एलसीबी'च्या पथकाची कारवाई

जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लाखो रुपयांचा गुटखा व पान मसाल्याचा साठा ट्रकसह जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

seized truck
seized truck
author img

By

Published : Aug 12, 2020, 5:53 PM IST

जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा वाहून नेणारा एक ट्रक पकडला आहे. मंगळवारी (11 ऑगस्ट) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ट्रकसह सुमारे 23 लाख 33 हजार 880 रुपयांचा गुटखा तसेच पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रक लाखो रुपयांचा गुटखा तसेच पान मसाल्याचा साठा घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी धरणगाव शहराजवळ रस्त्यावर सापळा लावला होता. रात्री उशिरा एक ट्रक धरणगावातून जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्यानंतर ट्रकमध्ये काय आहे, म्हणून चालकाला विचारणा केली असता त्याने, उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता क्रेटमधून गुटखा तसेच पान मसाल्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रक, गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला. त्याचप्रमाणे, शेख रफिक शेख रज्जाक व कपिल रवींद्रसिंग राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटखा व पान मसाल्याची किंमत सुमारे 23 लाख 33 हजार 880 रुपये इतकी आहे.

याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 328, 188, 272, 273 तसेच साथीचे रोग अधिनियम 3 व आपत्ती व्यवस्थापन सन 2005 चे कलम 51(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, नारायण पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामचंद्र बोरसे, रवींद्र घुगे, पोलीस नाईक मनोज दुसाने, महेश महाजन आदींच्या पथकाने केली.

दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यात बंदीच्या काळातही गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.