ETV Bharat / state

धक्कादायक! मुक्ताईनगरातील कोविड सेंटरमध्ये जेवणात आढळल्या अळ्या - मुक्ताईनगर कोविड सेंटर

गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सोईसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. सोमवारी दुपारी तर एक धक्कादायक प्रकार समोर आला. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, जेवणात किडे व अळ्या आढळून आल्या.

larvae-found-in-the-food-at-the-covid-center-of-muktainagar-jalgaon
मुक्ताईनगरातील कोविड सेंटरमध्ये जेवणात आढळल्या अळ्या
author img

By

Published : Aug 25, 2020, 7:36 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे असलेल्या श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात किडे व अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. या प्रकारासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, जेवण पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सोईसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. सोमवारी दुपारी तर एक धक्कादायक प्रकार समोर आला. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, जेवणात किडे व अळ्या आढळून आल्या. काही रुग्णांनी या प्रकाराबाबत जेवण देणाऱ्या ठेकेदाराच्या कामगाराला विचारणा केली असता, त्याने रुग्णांशी अरेरावी करत 'तुम्हाला आणखी 10 दिवस काढायचे आहेत', अशी धमकी दिली. त्यानंतर एका रुग्णाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली. अ‌ॅड. रोहिणी खडसे यांनी तक्रारीची दखल घेऊन तत्काळ मुक्ताईनगरचे तहसीलदार यांना सोबत घेऊन थेट कोविड सेंटर गाठले.

मुक्ताईनगरातील कोविड सेंटरमध्ये जेवणात आढळल्या अळ्या

यावेळी तेथील रुग्णांनी त्यांना मिळालेले निकृष्ट दर्जाचे किडे व अळ्या असलेले जेवण दाखवले. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी तहसीलदारांना याबाबतीत विचारणा करून, जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला समक्ष बोलावून कारवाई करण्याची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, ठेकेदाराच्या कामगाराने यावेळी तहसीलदारांसमोर रुग्णांशी अरेरावी केली. नंतर रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत संपर्क साधून या प्रकाराबाबत तक्रार केली.

एकनाथ खडसे यांनीही सेंटरला दिली भेट-

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी देखील कोविड सेंटरला भेट दिली. घडलेल्या प्रकाराबाबत ठेकेदारावर तत्काळ कारवाई करून रुग्णांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार यांना केल्या. दरम्यान, यावेळी काही रुग्णांनी त्यांच्याकडे समस्या मांडल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.