ETV Bharat / state

First Lady Sarpanch of Shinde Group : शिंदे गटाची राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीवर सत्ता, 'या' ग्रामपंचायतीवर फडकविला झेंडा

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी सरपंचपदापर्यंत सर्व राजकीय समीकरण बदलली ( Political Equation Has Changed ) असल्याचे पाहायला मिळाले. या सरकारमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदानंतर थेट राज्यात शिंदे गटाच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान ( First Lady Sarpanch of Shinde Group ) जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथील यमुनाबाई ठाकरे ( Yamunabai Hilal Thackeray ) यांना मिळाला आहे. आम्ही सर्व गावाच्या विकासासाठी शिंदे सरकार यांच्या गटात ( Former Minister Gulabrao Patil ) सामील होऊन शिंदे सरकारचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवला आहे, असे मत सरपंच यांनी व्यक्त केले.

he first woman sarpanch of the Shinde group
शिंदे गटाच्या पहिल्या महिला सरपंच
author img

By

Published : Jul 24, 2022, 8:51 AM IST

जळगाव : एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतीला मिळाला आहे. कुसुंबा ग्रामपंचायतीचे ( Kusumba Gram Panchayat ) माजी मंत्री गुलाबराव पाटील ( Former Minister Gulabrao Patil ) यांच्या नेतृत्वात झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे ( Yamunabai Hilal Thackeray ) या सरपंचपदी विराजमान ( First Lady Sarpanch of Shinde Group ) झाल्या आहेत. महाविकास आघाडीमधून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार व मंत्र्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळा गट स्थापन केला व भाजपसोबत राज्यात शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील सत्ता समीकरणे बदलली : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी सरपंचपदापर्यंत सर्व राजकीय समीकरण बदलली असल्याचे पाहायला मिळाले. यातच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी, तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. मात्र, अद्यापि मंत्रिमंडळाचा विस्तार हा बाकी असला, तरी मात्र या सरकारमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदानंतर थेट राज्यात शिंदे गटाच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथील यमुनाबाई ठाकरे यांना मिळाला आहे. आम्ही सर्व गावाच्या विकासासाठी शिंदे सरकार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गटात सामील होऊन शिंदे सरकारचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवला आहे, असे मत सरपंच यांनी व्यक्त केले.

शिंदे गटाच्या पहिल्या महिला सरपंच

कुसुंबा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची महिला सरपंच : एकीकडे राज्याचे सत्ता समीकरण बदलली व त्यातच अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर जरी लढवली जात नसली. तरी मात्र पक्षाच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे जळगावातील शिंदे गटाचे माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात कुसुंबा ग्रामपंचायतीमध्ये समर्थक पॅनलच्या माध्यमातून सरपंचपदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे यांना 17 पैकी नऊ मते मिळून सरपंचपदी विजयी झाले आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या पहिला महिला सरपंच म्हणून यमुनाबाई ठाकरे यांना बहुमान मिळाला असून कुसुंबा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.

गावच्या विकासासाठी भरघोस निधी आणू : कुसुंबा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकल्यानंतर तेथील महिला सरपंचांनी माजी मंत्री गुलाबराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू, असे सांगितले. त्यांचा शब्द मानत आम्ही शिंदे गटाच्या पॅनेलखाली निवडणूक लढवली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून गावाचा कायापालट करू, या करिताच आम्ही शिंदे सरकारचा झेंडा फडकवला असल्याचे मत माजी सरपंच यांनी व्यक्त केले.

आम्हाला प्रथम ग्रामपंचायत असल्याचा अभिमान : महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत शिंदे सरकारची कुसुंबा येथे स्थापन झाल्यानेच आम्हाला अभिमान आहे. आम्ही सर्व मिळून गावाच्या विकासासाठी सरपंच यांच्यासोबत नेहमीच राहून गावाचा कायापालट करून दाखवू, असे मत ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यक्त केले. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आम्ही आधी होतो आणि आताही राहणार आहोत. यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला त्यांच्यावर विश्वास असून, गावाच्या विकासासाठी त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही शिंदे सरकारची महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कुसुंबा या गावी स्थापन केली आहे.

गुलाबराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली विकास करू : महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत जळगावतील कुसुंबा या गावी शिंदे सरकारची स्थापना झाली असून, आता शिंदे सरकार आणि गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी किती निधी दिला जातो. गावात येत्या काही काळात कशा पद्धतीने शिंदे सरकारच्या माध्यमातून विकासकामे केली जातात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

हेही वाचा : Aaditya Thackeray : 'तुमच्या कपाळावर गद्दार लिहलयं, ते आता...'; आदित्य ठाकरेंचे बंडखोरांवर टीकेचे बाण सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.