ETV Bharat / state

कोथळी ग्रामपंचायतीत खडसे गटाला कौल; विरोधकांच्या पारड्यात 5 जागा

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाला जनमताचा कौल मिळाला आहे. एकूण 11 पैकी 6 जागांवर खडसे समर्थकांनी बाजी मारली. तर उर्वरित 5 जागांवर खडसेंचे पारंपरिक राजकीय विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक निवडून आले आहेत.

कोथळी ग्रामपंचायतीत खडसे गटाला कौल
कोथळी ग्रामपंचायतीत खडसे गटाला कौल
author img

By

Published : Jan 18, 2021, 1:29 PM IST

जळगाव - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाला जनमताचा कौल मिळाला आहे. एकूण 11 पैकी 6 जागांवर खडसे समर्थकांनी बाजी मारली. तर उर्वरित 5 जागांवर खडसेंचे पारंपरिक राजकीय विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक निवडून आले आहेत. दरम्यान, खडसे गटाकडून निवडून आलेले 6 जण हे आपलेच असल्याचा दावा याठिकाणी खडसेंच्या कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर आणि भाजप खासदार रक्षा खडसेंनी केला आहे. त्यामुळे पक्षीय सस्पेन्स कायम आहे.

कोथळी ग्रामपंचायतीत खडसे गटाला कौल

कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 11 जागांपैकी 1 जागा बिनविरोध निवडून आली होती. त्यानंतर 10 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात होते. एकनाथ खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने याठिकाणी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत आहे. परंतु, कोथळीत मात्र, लढत वेगळी होती. याठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांचेही समर्थक रिंगणात असल्याने राष्ट्रवादी व भाजप हे एकत्र होते. या दोन्ही पक्षांच्या विरुद्ध शिवसेना अशी लढत येथे रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यात खडसे गटाच्या पारड्यात 6 तर शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या पारड्यात 5 जागा गेल्या. अवघ्या एका जागेचे बहुमत खडसे गटाकडे आहे. त्यामुळे सरपंच निवडीत रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे. सरपंच निवडीवेळी अपक्ष उमेदवाराची भूमिका निर्णायक ठरू शकते.

  • खडसे गटाचे विजयी उमेदवार -

राखी गणेश राणे

नारायण नामदेव चौधरी

उमेश सुभाष राणे

अनुराधा योगेश चौधरी

मीराबाई श्यामराव पाटील

वंदना विजय चौधरी

  • शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार -

योगेश निनू राणे

पंकज अशोक राणे

मोहन रमेश कोळी

ताराबाई प्रल्हाद भिल्ल

शीतल संदीप विटकरे
योगेश राणे

दरम्यान, वर्षानुवर्षे कोथळी गावाचा विकास रखडला आहे. त्यामुळे यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत खडसे गटाच्या विरोधात नवपरिवर्तन पॅनल रिंगणात उभे केले होते. त्यात आमच्या वाट्याला 5 जागा आल्या. आम्हाला जनमताचा कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया नवपरिवर्तन पॅनलचे उमेदवार योगेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हा तर एकनाथ खडसेंच्या समर्थकांचा विजय

कोथळी ग्रामपंचायतीत सहा जागा खडसे समर्थकांच्या निवडून आल्या आहेत. यात ते कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा ते खडसे समर्थक आहेत, हे महत्त्वाचे आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील खडसे कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर होत नसते. त्यामुळे हा एकनाथ खडसेंच्या समर्थकांचा विजय आहे, असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी दिली.

नाथाभाऊंच्या विचारांचा विजय
मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बाजी मारली आहे. ही निवडणूक नाथाभाऊंच्या सोबतच माझ्यासाठी देखील महत्त्वाची होती. कोथळीत नाथाभाऊंना मानणारे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे हा नाथाभाऊंच्या विचारांचा विजय आहे असे म्हणता येईल, असे भाजप खासदार रक्षा खडसे निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.