ETV Bharat / state

जामनेरच्या वादग्रस्त संकुलाची शासनाच्या चौकशी समितीकडून पाहणी

जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या वादग्रस्त व्यापारी संकुलाची सोमवारी राज्य शासनाच्या चौकशी समितीच्या सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. या व्यापारी संकुलाच्या कामात भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप जळगावातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजय पाटील यांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे.

जामनेर
जामनेर
author img

By

Published : May 18, 2021, 11:49 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या वादग्रस्त व्यापारी संकुलाची सोमवारी राज्य शासनाच्या चौकशी समितीच्या सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. चौकशी समिती सदस्यांनी संकुलाच्या बांधकामासंदर्भात सविस्तर माहिती देखील घेतली. या व्यापारी संकुलाच्या कामात भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप जळगावातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजय पाटील यांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. विजय पाटील यांनी, जामनेर शहरात जिल्हा परिषदेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर बांधलेल्या व्यापारी संकुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाला असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजीमंत्री गिरीश महाजन हे या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे तक्रार देखील केली होती.

चौकशी समितीची जामनेरला भेट-

अ‍ॅड. विजय पाटील यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी राज्य शासनाने चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत जाऊन व्यापारी संकुलाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली होती. सोमवारी ही समिती जामनेरात दाखल झाली. या समितीने व्यापारी संकुलासह उर्दू शाळेची पाहणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष मनीष सांगळे, सहायक आयुक्त राजन पाटील, सदस्य चंद्रकांत वानखेडे यांच्यासह जळगाव नगररचना विभागाचे दोन तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अन्य एक अधिकारी सहभागी झाले होते. या पाहणीचा हवाल समितीकडून राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.