जळगाव - रशिया-युक्रेनमध्ये सुरू झाले आहेत. ( Russia Ukrain War ) अशा परिस्थितीत सध्या यूक्रेनमध्ये जळगावातील तब्बल 19 विद्यार्थी अडकले. ( Student From Jalgaon Stuck in Ukrain ) अद्याप काही विद्यार्थ्यांसोबत पालकांचा संपर्क होत आहे. तर काहीशी संपर्क तुटला आहे. यामुळे अनेक पालक चिंतेत आहे. एक शेतकरी कुटुंबातील मुलगाही यूक्रेनमध्ये अडकला आहे. ओम कोल्हेच्या आई निलिमा शिक्षिका तर वडील मनोज कोल्हे हे शेतकरी आहेत. मुलाने खूप शिकावे, मोठ व्हावे म्हणून या दाम्पत्याने त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला पाठवले. १३ डिसेंबर २०२१ रोजी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनमध्ये केला. याठिकाणी पोलतावा युनिव्हर्सिटीमध्ये त्याने प्रवेश घेतला. दोन ते तीन महिने उलटले शिक्षण सुरू असतानाच अचानक रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. ( Russia Ukrain War Imact on India )
परिवाराला चिंता -
एकुलता एक असल्याने आमच्या त्याच्या आई वडिलांची काळजी वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्हिडिओ कॉल व्हॉट्ऑप कॉलिगवर रोज त्यांचे बोलणे असल्यामुळे मनाला थोडफार समाधान मिळते आहे. मात्र, काळजी आणि भीती कायम आहे, असे ओमच्या आईने सांगितले. शेतात राबराब राबून आपल्या एकुंता एक मुलाने माझं नाव कमवा व गोरगरिबांची आपल्या वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून सेवा करावी हीच माझी अपेक्षा होती. यामुळेच मी माझ्या मुलाला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पाठविले. मात्र, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर आता तर मला त्याची चिंता वाटू लागली आहे. व तो नेमका मला डोळ्यांनी कधी दिसणार व घरी कधी परतणार याचीच वाट आम्ही पाहत आहोत, असे ओमच्या परिवाराने सांगितले.
भारतीय दुतावासाने केली मदत -
युद्धाच्या दोन ते तीन दिवसांनंतर ओम ज्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतो त्या युनिव्हर्सिटीत ओमसोबतच इतरही ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी भारतीय दुतावासासोबत संपर्क साधला. दुतावास विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली. भारतीय दुतावासाकडून पोलतावा येथुन सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. पोलतावा येथुन बसने हंगेरी बॉर्डर येथे पोहोचणार आहेत व त्या ठिकाणाहुन विमानाने भारतात येणार असल्याचा ओमने बोलतांना सांगितले आहे.
दरम्यान, ओम जरी भारतात येण्यासाठी निघाला आहे. ओमला त्याच्या आईवडिलांना भेटण्याची उत्सुकता तर आईवडिलांना ओमला पाहण्याची उत्सुकता लागलीयं. जोपर्यंत ओमला प्रत्यक्ष पाहणार नाही तोपर्यंत मनाला आनंद मिळणार नाही त्याला पाहण्यासाठी डोळे आतुरलेले असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.