ETV Bharat / state

विद्यार्थ्याची आत्महत्या, लॉकडाऊनमध्ये खाण्यापिण्याचे हाल झाल्याने कृत्य केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

22 वर्षीय विद्यार्थ्याने नाशिकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास उजेडात आली. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये खाण्यापिण्याचे हाल असह्य झाल्याने आपल्या मुलाने जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Apr 21, 2020, 7:45 PM IST

Updated : Apr 21, 2020, 8:54 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर येथील एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने नाशिकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 11च्या सुमारास उजेडात आली. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये खाण्यापिण्याचे हाल असह्य झाल्याने आपल्या मुलाने जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे रावेरसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुपेश भरत पाटील (वय 22, मूळ रा. रावेर, जि. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. नाशिकमध्ये सातपूरच्या पाईपलाईन रस्ता परिसरात तो राहत होता.

रुपेश हा त्याचा मोठा भाऊ मयूर याच्यासोबत नाशिकला खोली घेऊन एकत्र राहत होते. मयूर हा डिझाईन इंजिनिअर होता. तो नोकरी करत असल्याने रुपेश त्याच्याकडे राहत होता. रुपेश एनडीएमपीव्ही महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. मात्र, अलीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जिल्हाबंदी असल्याने दोघे भाऊ नाशिकला अडकून पडले होते. लॉकडाऊनमुळे मेस देखील बंद झाल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे खूप हाल होत होते. ही बाब त्यांनी वडिलांना अनेकदा कळवली होती. जिवाचे हाल होत असल्याने त्यांनी आपल्याला गावी परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, म्हणून विनंती देखील केली होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधून विनंती केली होती. पण दोघांना परत आणण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेही भरत पाटील यांनी 14 एप्रिल रोजी विनंती अर्ज केला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. तिकडे दोन्ही भावांनी देखील गावी येण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यात यश न आल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते.

मंगळवारी रुपेशने नैराश्यातून आत्महत्येचे कठोर पाऊल उचलले. ही घटना समोर आल्यानंतर रुपेशच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. लॉकडाऊनमध्ये खाण्यापिण्याचे हाल असह्य झाल्याने आपल्या मुलाने जीवनयात्रा संपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मयत रुपेशच्या मृतदेहावर नाशकातील जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह रावेरला आणला जात आहे. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.