जळगाव - रस्त्यात अडसर येणाऱ्या झाडांची कत्तल न करता त्यावर रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषद व येथील कला प्रेमींनी केला ( Pachora Nagar Parishad Trees Colouring ) आहे. यामध्यामातून ही झाडे बोलकी झाली आहे. त्यामुळे शहरातील सौंदर्यात भर पडली आहे.
पाचोरा येथे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील रस्त्यावर अडसर ठरणाऱ्या झाडांची कत्तल न करता त्यावर चित्रकला करण्यात आली. यामाध्यमातून सुशोभीकरण नाही तर पुरातन झाडांचे जतन होवून जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे पाचोऱ्यातील ही झाडे आता बोलकी झाली असून, सौंदर्यात देखील भर पडली आहे. ही संकल्पना येथील समाजसेवक मुकुंद बिल्दीकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
कलाप्रेमी भूषण पेंढारकर राहुल पाटील जितेंद्र काळे यांनी शहरातील 100 च्यावर पुरातन झाडांवर विविध प्राणी पक्षी व पर्यावरण पूरक संदेश देणारी कलाकृती साकारली. या कलाकृतीमुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही झाडे आता बोलू लागली आहे. नागरिकांना मुंबई, पुणे आणि नाशिक अशा मेट्रो सिटीत वावरत असल्याचे चित्र पाचोरा शहरात दिसत आहे. त्यामुळे राज्यात पाचोरा पॅटर्न राबवण्यात यावा ही अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Weather Forecast Vidarbha : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज