ETV Bharat / state

जळगाव मतदारसंघ : राजकीय गणिते बदलली; भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढतीचे संकेत

उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपमधील वाघ विरोधक अंग झटकून कामाला लागले आहेत. जळगाव महापालिकेतील सर्व नगरसेवकही आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या देवकरांना कडवे आव्हान उभे राहिल्याचं दिसून येत आहे.

author img

By

Published : Apr 7, 2019, 11:38 AM IST

भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढतीचे संकेत

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलल्याने राजकीय गणितं बदलली आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासाठी सोपी वाटणारी लढत आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ होण्याचे संकेत आहेत.

भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढतीचे संकेत

जळगावचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा पत्ता कापून भाजपने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, वाघ यांना उमेदवारी दिल्याने खासदार पाटील तसेच अमळनेरचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातदेखील जळगावची जागा धोक्यात असल्याचा अहवाल आल्याने भाजपने सावध पवित्रा घेत ऐनवेळी स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना पुढे केले.

पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी कापून ४ वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणं, हा 'राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्मिता वाघ आणि त्यांचे पती तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली. ते प्रचाराच्या प्रक्रियेपासून दूर झाल्याचे दिसत आहे. वाघ यांच्या समर्थकांमध्येही नाराजी असल्याने उन्मेष पाटलांना प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकारांसोबतच स्वकियांचे मोठं आव्हान आहे.

उमेदवार बदलानंतर भाजपमधील अंतर्गत कलह काहीअंशी कमी झाला असला तरी मित्रपक्ष असलेली शिवसेना अजूनही पूर्णपणे भाजपच्या पाठीशी नसल्याचे चित्र आहे. पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची नाराजी दूर करण्यात भाजपला अजूनही यश आलेले नाही. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी उमेदवार गुलाबराव देवकर यांना आमदार आणि मंत्रीपदाच्या काळात चांगली कामे केली असल्याने जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास आहे. या दोन्ही बाबी उन्मेष पाटलांच्या वाटेत अडसर ठरू शकतात, असेही बोललं जात आहे.

उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपमधील वाघ विरोधक अंग झटकून कामाला लागले आहेत. जळगाव महापालिकेतील सर्व नगरसेवकही आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या देवकरांना कडवे आव्हान उभे राहिल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच, जळगाव लोकसभेत प्रथमदर्शनी एकतर्फी वाटणारी लढत आता चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Intro:Feed send to FTP
जळगाव
जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलल्याने राजकीय गणितं बदलली आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासाठी सोपी वाटणारी लढत आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीमुळं तुल्यबळ होण्याचे संकेत आहेत.Body:जळगावचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा पत्ता कापून भाजपने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, वाघ यांना उमेदवारी दिल्यानं खासदार पाटील तसेच अमळनेरचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात देखील जळगावची जागा धोक्यात असल्याचा अहवाल आल्याने भाजपने सावध पवित्रा घेत ऐनवेळी स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटलांना पुढं केलयं.

बाईट : उन्मेष पाटील, भाजप उमेदवार

पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी कापून चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणं, हा 'राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याची तीव्र प्रतिक्रिया देऊन स्मिता वाघ आणि त्यांचे पती तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे प्रचाराच्या प्रक्रियेपासून दूर झाल्याचे दिसतंय. वाघ यांच्या समर्थकांमध्येही नाराजी असल्यानं उन्मेष पाटलांना प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकारांसोबतच स्वकियांचे मोठं आव्हान आहे.

बाईट : स्मिता वाघ, विधानपरिषद सदस्या

उमेदवार बदलानंतर भाजपमधील अंतर्गत कलह काहीअंशी कमी झाला असला तरी मित्रपक्ष असलेली शिवसेना अजूनही पूर्णपणे भाजपच्या पाठीशी नसल्याचं चित्र आहे. पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची नाराजी दूर करण्यात भाजपला अजूनही यश आलेलं नाही. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी उमेदवार गुलाबराव देवकर यांना आमदार आणि मंत्रीपदाच्या काळात चांगली कामे केली असल्यानं जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास आहे. या दोन्ही बाबी उन्मेष पाटलांच्या वाटेत अडसर ठरू शकतात, असेही बोललं जातंय.

बाईट : गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे उमेदवारConclusion:उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं भाजपमधील वाघ विरोधक अंग झटकून कामाला लागले आहेत. जळगाव महापालिकेतील सर्व नगरसेवकही आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या देवकरांना कडवे आव्हान उभं राहिल्याचं दिसून येतंय. एकंदरीतच, जळगाव लोकसभेत प्रथमदर्शनी एकतर्फी वाटणारी लढत आता चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.