जळगाव - शहरातील शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याची सव्वा लाख रुपयांना फसवणूक झाली. स्वराज-४४७ ट्रॅक्टर अवघ्या १ लाख ३० हजार रुपयांत विकला जात असल्याचे सांगत ही फसवणूक करण्यात आली. अशोक विश्वनाथ बारसे (वय-५०, रा. बारसे कॉलनी) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतीच्या कामासाठी बारसे यांना ट्रॅक्टरची आवश्यकता होती. त्यांचा मित्र धनराज भगवान करे (रा. जळका, ता.जि.जळगाव) यांना एका ॲपवर अशोकसिंग गुर्जर हे ट्रक्टर विकत असल्याचे समजले. दोघांनी अशोक सिंग गुर्जर या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करून बोलणी केली. अर्धी रक्कम अगोदर द्यावी व उर्वरीत रक्कम द्यावी असे ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ नाहेंबरला व १७ नाव्हेंबरला नरेश याच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बारसे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.