ETV Bharat / state

जळगाव: बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्षाची स्थापना - Bird flu update news

महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या 30 टिम स्थापन करण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून, मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत आहेत.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्षाची स्थापना

author img

By

Published : Jan 16, 2021, 6:27 PM IST

जळगाव - महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा दुरध्वनी क्र. 0257-2958200/2262808 हा असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील यांनी दिली आहे.

स्थलांतरीत पक्ष्यांशी संपर्क टाळावा

जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या 30 टिम स्थापन करण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत आहेत. पक्षी मालकांनी आपल्या कुक्कुट पक्ष्यांचा स्थलांतरीत पक्ष्यांशी संपर्क टाळावा, कुक्कुट पक्ष्यात असाधारण मरतूक आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

बर्ड फ्ल्यूबाबत नागरीकांनी भिती बाळगू नये

पूर्ण शिजवलेले चिकन व उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षीत आहे. बर्ड फ्ल्यू आजार पक्ष्यांपासून थेट माणसांना होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे बर्ड फ्ल्यूबाबत नागरीकांनी भिती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभाग सज्ज

आपात परिस्थितीसाठी लागणारे पी. पी. ई किट, सॅनिटाईझर, मास्क, ग्लोज आदि साहित्य जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कुठलीही आपात परिस्थिती हाताळण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.