ETV Bharat / state

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यात रुग्णालयांची 'थ्री टायर सिटीम्स'; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यात रुग्णालयांची 'थ्री टायर सिटीम्स' तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये काेव्हिड केअर, काेव्हिड हेल्थ केअर आणि काेव्हिड हाॅस्पिटल अशी त्रिस्तरीय रचना असेल, याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
author img

By

Published : Apr 15, 2020, 5:46 PM IST

जळगाव - जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे तूर्तास जळगाव जिल्हा काेराेनामुक्त झालेला असला तरी धाेका कायम आहे. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तरी तिचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यात रुग्णालयांची 'थ्री टायर सिटीम्स' तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये काेव्हिड केअर, काेव्हिड हेल्थ केअर आणि काेव्हिड हाॅस्पिटल अशी त्रिस्तरीय रचना असेल, याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

वाढीव लाॅकडाऊनसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, पाेलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्सक नागाेराव चव्हाण उपस्थित हाेते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात दाेन काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले हाेते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाचा आता अहवाल निगेटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात ४७ संशयित दाखल आहेत. मंगळवारी नव्याने १३ दाखल झाले होते. हायरिस्क व लाे रिस्क अशी त्यांची वर्गवारी करण्यात आली असून, त्यांचे नमुने प्रयाेगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तूर्तास जिल्हा काेराेनामुक्त झाला, असे म्हणता येईल. मात्र, धाेका कायम आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात शिथिलता आल्यासारखे वातावरण आहे. माेठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. हे चुकीचे आहे. जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी लाॅकडाऊनचे पालन केले पाहिजे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी गर्दी हाेत असल्यास पुन्हा बंदी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काेराेना तपासणी प्रयाेगशाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

अन्यथा डाॅक्टरांवर कारवाई करू...

खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याबाबत डाॅक्टरांना आवाहन करण्यात आलेले आहे. त्यांची बैठक घेऊन तशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. डाॅक्टरांनी रुग्णांना नाकारू नये. डाॅक्टरांनी नाकारल्यास रुग्णांनी तक्रार करावी. त्या डाॅक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. खासगी डाॅक्टर रुग्णांना सेवा देत नसल्याबाबत पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला हाेता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.