जळगाव Gold Price Hike : संपूर्ण देशात सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील इस्रायल हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जळगावच्या सुवर्णनगरीवर मोठ्या परिणाम (Jalgaon Gold Rate) झाल्याच पाहायला मिळत आहे. पितृपक्षामध्ये 57 हजार रुपये पर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा वधारला आहे. अवघ्या पंधरा दिवसांमह्ये सोन्याच्या भावामध्ये 4 हजार 200 रुपयांनी वाढ झाली आहे. संध्या सोन्याचे दर 61 हजार 200 रुपयांपर्यंत जावून पोहचले आहेत. तर दिवाळीच्या (Diwali 2023) दिवसांमध्ये अनेक जण सोने खरेदी करतात. त्यामुळे आगामी काळात सोन्याची चांगली मागणी वाढण्याची शक्यता आहे.
सोन्यात गुंतवणूक वाढली : इस्रायल हमास यांच्यात युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम हा सोन्याच्या बाजारावर सुद्धा परिणाम झाला आहे. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जात असल्यानं इतर ठिकाणची गुंतवणूक ही सोन्यात वळती झाली आहे. इतरही फंड हे सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आणि सोन्याचे दर हे 61 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचले. सोन्याचे भावात वाढ झाली असली तरी, सुवर्ण नगरीतील सराफा दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काळात दसरा दिवाळी सण आहे, लग्न सराई सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे भाव वाढ झाली असली तरी, त्याचा ग्राहकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी गर्दी : भाव वाढल्यामुळे बजेट कोलमडले असले तरी, पुन्हा आणखीन भाव वाढ होईल या भीतीनं नागरिक सोने खरेदीसाठी गर्दी करत आहेत. भाव वाढ झाल्याने ज्या प्रमाणात खरेदी करायची होती, त्याप्रमाणात खरेदी करताना हात आखडते घ्यावे लागत आहे. ग्राहक बजेटमध्ये सोने खरेदी करत आहेत, भाव काही प्रमाणात कमी व्हावेत अशी अपेक्षा ही ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे.
हेही वाचा -