ETV Bharat / state

चौकशीदरम्यान 'ईडी'ला सहकार्य करू - एकनाथ खडसे

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी ईडीने नोटीस बजावल्याची माहिती दिली. यापूर्वीही भोसरीतील भूखंडाबाबत चारवेळा चौकशीला सामोरे गेलो होतो, त्यातून मला क्लीन चिटही मिळाली. आताही चौकशीदरम्यान ईडीला सहकार्य करू, असे खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Dec 26, 2020, 6:46 PM IST

जळगाव - भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मला नोटीस बजावली आहे. ही नोटीस मला शनिवारी (दि. 26 डिसें.) मिळाली. मला 30 डिसेंबरला मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले आहे. ईडीच्या चौकशीला आपण सामोरे जाणार असून ईडीला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगावात दिली.

भोसरीतील भूखंड प्रकरणासंदर्भात ईडीने एकनाथ खडसे यांना नोटीस बजावल्याचे वृत्त शुक्रवारी (दि. 25 डिसें.) समोर आले होते. पण, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. एकनाथ खडसे हे आज (शनिवार) सायंकाळी वैयक्तिक कामानिमित्त जळगावात आले होते. त्यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या नोटीसीबाबत स्पष्टीकरण देत संभ्रम दूर केला. आपल्याला आजच भोसरीतील भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पाचव्यांदा चौकशी, सामोरे जाऊ

खडसे पुढे म्हणाले की, भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाचा व्यवहार माझ्या पत्नीच्या नावाने झाला आहे. त्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आता याच भूखंडाच्या संदर्भात मला ईडीने नोटीस बजावली आहे. याच प्रकरणाची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, आयकर विभाग तसेच न्यायमूर्ती झोटिंग समितीकडून चारवेळा चौकशी झाली आहे. प्रत्येकवेळी आपण आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार मला क्लीन चिटही मिळाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आताही आपण चौकशीला सामोरे जाणार आहोत. ईडीलाही आधीच्या यंत्रणांप्रमाणे सहकार्य करू, असे खडसेंनी सांगितले.

इतर विषयांवर टाळले भाष्य

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यावेळी पत्रकारांच्या इतर प्रश्नांना बगल देत भाष्य करणे टाळले. एरवी जाहीरपणे सडेतोड भूमिका मांडणाऱ्या खडसेंनी पत्रकारांशी सविस्तर बोलणे टाळले. खडसेंच्या या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा - बनावट कागदपत्रांद्वारे खटोड बंधूकडून कोट्यवधीचे भूखंड हडप - अजय ललवाणी

हेही वाचा - 'गिरीश महाजनांच्या गैरव्यवहाराची फाईल मिळवण्यासाठी पोलिसांकडून माझ्या घराची बेकायदेशीर झडती'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.