ETV Bharat / state

एक चांगला सहकारी गमावला; हरिभाऊ जावळेंच्या निधनावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया - haribhau jawle dies jalgaon

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः केळी उत्पादकांच्या हितासाठी हरिभाऊ जावळे सदैव लढत राहिले. कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात राहून समाजकारण कसे करावे? हे अनेकांना शिकवले. जिल्ह्यातील जनतेशी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मनात कधीच अहंकार आला नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

eknath khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Jun 16, 2020, 8:19 PM IST

Updated : Jun 16, 2020, 9:30 PM IST

जळगाव - जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढावा, म्हणून हरिभाऊ जावळेंनी खूप काम केले. आज जिल्ह्यात जो भारतीय जनता पक्ष वाढला, त्यात हरिभाऊंचा खूप मोलाचा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे आपल्यातून असे अचानक निघून जाणे खूपच वेदनादायी आहे. मी एक चांगला सहकारी गमावला आहे, अशा भावना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ खडसे, ज्येष्ठ भाजप नेते

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः केळी उत्पादकांच्या हितासाठी ते सदैव लढत राहिले. कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात राहून समाजकारण कसे करावे? हे अनेकांना शिकवले. जिल्ह्यातील जनतेशी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मनात कधीच अहंकार आला नाही. हरिभाऊंचे आणि माझे नाते कौटुंबिक स्वरुपाचे आहे. त्यांनी आयुष्यात कधीच या कौटुंबिक प्रेमात दरी निर्माण होऊ दिली नाही. हरिभाऊंच्या जाण्याने आज पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

समाजाचे सुद्धा मोठे नुकसान आहे. असे नेतृत्व घडायला खूप वर्ष लागतात. हरिभाऊंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघण्यासाठी आहे. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष अशा प्रकारचे काम केले. विशेषत: मधुकर सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन राहिले. या काळामध्ये साखर कारखान्याला चांगले दिवस यावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.

हेही वाचा - रावेर मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

हरिभाऊ मुंबईला हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो. तीन दिवसांपूर्वी मुंबईला असताना त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली इंजेक्शन उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मी स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचे डॉक्टर संजय मुखर्जी यांच्याशी सातत्याने संपर्क केला. तीन दिवसांपूर्वी दोन इंजेक्शन उपलब्ध झाली. काल (सोमवारी) तीन इंजेक्शन उपलब्ध झाले आणि दुपारी साडेबारा वाजता दोन इंजेक्शन उपलब्ध झाले. मात्र, तो पर्यंत खूप उशीर झाला. जर इंजेक्शन वेळेत उपलब्ध होऊ शकले असते, तर कदाचित हरिभाऊ आज आमच्यात असते.

मात्र, नियतीला ते मान्य नव्हते आणि उपचार घेत असतानाच दुर्दैवाने हरिभाऊ यांचे निधन झाले. सचोटीने व्यवहार करणारा, प्रामाणिकपणाने काम करणारा, कौटुंबिक नाते निर्माण करणारा एक सहकारी आम्ही गमावला आहे, असेही खडसे म्हणाले.

Last Updated : Jun 16, 2020, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.