ETV Bharat / state

राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच्यावर टीका करणे चुकीचे - गिरीश महाजन - Jalgaon District Latest News

राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या थरावर जाऊन बोलणे, टीका करणे अतिशय चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

गिरीश महाजन
गिरीश महाजन
author img

By

Published : Feb 5, 2021, 3:27 PM IST

जळगाव - राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या थरावर जाऊन बोलणे, टीका करणे अतिशय चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, या माणसामुळे अडचणी येत असल्याची टीका गुरुवारी यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल गतसिंह कोश्यारी यांच्यावर केली होती.

महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज (शुक्रवारी) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात देखील माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपालांवर टीका करणे चुकीचे

ही बाब लोकशाहीला घातक

गिरीश महाजन पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल असतो. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. ते राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे राज्यपालांवर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अतिशय चुकीचे आहे. प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. विरोधकांनी बोलताना तारतम्य ठेवायला हवे. मुंबईत देखील शेतकरी आंदोलनावेळी शेतकरी नेते तसेच काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी राज्यपालांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. ही बाब लोकशाहीला घातक आहे. आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा नाही. महाराष्ट्रात हा चुकीचा पायंडा पडत असल्याचेही महाजन यावेळी म्हणाले.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर बोलणे टाळले

पत्रकारांनी यावेळी गिरीश महाजन यांना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत विचारणा केली. मात्र, गिरीश महाजन यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याविषयी बोलणे टाळले. पटोले यांनी राजीनामा दिला, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सांगत गिरीश महाजन यांनी अधिक बोलणे टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.