ETV Bharat / state

उद्या दुपारपर्यंत बंडखोरीबाबत सर्व काही स्थिर होईल - गिरीश महाजन - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 13 ऑक्टोबरला जळगावात सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गिरीश महाजन रविवारी सायंकाळी शहरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन
author img

By

Published : Oct 6, 2019, 8:17 PM IST

जळगाव - राज्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि सेना युतीत बंडखोरीचे वादळ उठले आहे. मात्र, बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील आहोत. सोमवारी दुपारपर्यंत सर्व काही स्थिर होईल. या प्रश्नी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात व्यक्त केला.

गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 13 ऑक्टोबरला जळगावात सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गिरीश महाजन रविवारी सायंकाळी शहरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा - प्रेमीयुगुलाचे मृतदेह खाणीत आढळले ; जळगावमधील घटना

महाजन पुढे म्हणाले, राज्यात सर्वत्र भाजप-सेना युतीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळावे, असे दोन्ही पक्षांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. याच विचारातून थोडी नाराजी आहे. मात्र, ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील आहोत. माझ्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने मी कालच नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांशी चर्चा केली. उद्या दुपारपर्यंत सर्व काही स्थिरस्थावर होईल. ज्यांना युतीचे ए. बी. फॉर्म देण्यात आले आहेत, तेच उमेदवार कायम असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तिकीट कापाकापीचा फरक पडणार नाही -

यावेळी भाजपने पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकीटे कापली आहेत, याचा पक्षाला फटका बसेल का? याबाबत छेडले असता महाजन म्हणाले, पक्षाने ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत जबाबदारी बदलली आहे. त्याला तिकीट कापले, असे म्हणता येणार नाही. या बाबीचा पक्षाला कुठेही फटका बसणार नाही, याची आपल्याला खात्री आहे. कारण आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कुठेही समर्थन नाही. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत युतीला 3 चतुर्थांश म्हणजे 230 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत गिरीश महाजनांनी मित्रपक्षांच्या नाराजीचेही खंडन केले.

मोदींची १३ ऑक्टोबरला जळगावात महासभा-

विधानसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 13 ऑक्टोबरला जळगावात महासभा होणार आहे. शहरातील भुसावळ रस्त्यावरील टीव्ही टॉवर जवळील मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचे काम जोरात सुरू असल्याचेही यावेळी गिरीश महाजनांनी सांगितले.

हेही वाचा - महिलांच्या अंगावर अॅसिड फेकून सोनसाखळी ओरबाडणाऱ्या तरुणीस पकडले

Intro:जळगाव
राज्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि सेना युतीत बंडखोरीचे वादळ उठले आहे. मात्र, बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील आहोत. उद्या दुपारपर्यंत सर्व काही स्थिरस्थावर होईल. या प्रश्नी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला.Body:विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १३ ऑक्टोबरला जळगावात सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गिरीश महाजन रविवारी सायंकाळी शहरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महाजन पुढे म्हणाले, राज्यात सर्वत्र भाजप-सेना युतीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळावे, असे दोन्ही पक्षांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. याच विचारातून थोडी नाराजी आहे. मात्र, ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील आहोत. माझ्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने मी कालच नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांशी चर्चा केली. उद्या दुपारपर्यंत सर्व काही स्थिरस्थावर होईल. ज्यांना युतीचे ए. बी. फॉर्म देण्यात आले आहेत, तेच उमेदवार कायम असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तिकीट कापाकापीचा फरक पडणार नाही-

यावेळी भाजपने पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकीटे कापली आहेत, याचा पक्षाला फटका बसेल का, याबाबत छेडले असता महाजन म्हणाले, पक्षाने ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत जबाबदारी बदलली आहे. त्याला तिकीट कापले असे म्हणता येणार नाही. या बाबीचा पक्षाला कुठेही फटका बसणार नाही, याची आपल्याला खात्री आहे. कारण आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कुठेही समर्थन नाही. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आपल्याला आलाच आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत युतीला तीन चतुर्थांश म्हणजे २३० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत गिरीश महाजनांनी मित्रपक्षांच्या नाराजीचेही खंडन केले.Conclusion:मोदींची १३ ऑक्टोबरला जळगावात महासभा-

विधानसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १३ ऑक्टोबरला जळगावात महासभा होणार आहे. शहरातील भुसावळ रस्त्यावरील टीव्ही टॉवर जवळील मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचे काम जोरात सुरू असल्याचेही यावेळी गिरीश महाजनांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.