ETV Bharat / state

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या २४७ जणांवर गुन्हे दाखल

author img

By

Published : Apr 23, 2020, 4:51 PM IST

१० ते २१ एप्रिल या ११ दिवसांत जळगाव शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करुन नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात आत्तापर्यंत २४७ जणांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

FIR against peoples who brake the rules of lock down
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या २४७ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव - कोरोनाचा संसंर्ग वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन पाळला जात आहे. तरीदेखील अनेक लोक नियम मोडत आहेत. गेल्या ११ दिवसात २४७ जणांवर जळगावातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देविदास कुनगर पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या नावाने अनेक जण घराबाहेर पडत आहेत. यातील काही जण तोंडाला मास्कदेखील लावत नाहीत. ऑटो रिक्षा बंद असतानादेखील रस्त्यावर फिरत आहेत. दुकानदार दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवत आहेत. अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.

१० ते २१ एप्रिल या ११ दिवसांत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करुन नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात आत्तापर्यंत २४७ जणांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शहर पोलीस ठाण्यात ८४, जिल्हापेठ २२, एमआयडीसी ८८, रामानंदनगर २५, तालुका ४ तर शनिपेठ पोलीस ठाण्यात २४ गुन्हे दाखल आहेत. वाहने जप्त, दुकानदारांवर कारवाई-विनाकारण दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणाऱ्या लोकांवरही कारवाई करण्यात आली आहे. यात शहर पोलिसांनी ५१ दुचाकी, १५ रिक्षा, दोन चारचाकी जप्त केल्या. जिल्हापेठ पोलिसांनी नऊ दुचाकी, १२ रिक्षा, एमआयडीसी पोलिसांनी ७८ दुचाकी, एक चारचाकी, रामानंदनगर पोलिसांनी १४ दुचाकी, एक रिक्षा व तालुका पोलिसांनी ४ दुचाकी जप्त केल्या. न्यायालयाच्या आदेशाने ही वाहने परत सोडण्यात आली आहेत. यासह दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवणाऱ्या ५० दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३४ हजारांचा दंड वसूल-मोटार वाहन कलमांन्वये ११ दिवसांत एकूण १५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहन मालकांकडून ३४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.