ETV Bharat / state

जळगाव : कोरोनाचे नियम मोडणे काँग्रेस नेत्यांना भोवले, अजिंठा विश्रामगृहातील बैठक प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी आमदार शिंदेंनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती.

Fir against congress leaders
Fir against congress leaders
author img

By

Published : May 18, 2021, 3:12 PM IST

जळगाव - काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी आमदार शिंदेंनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. या बैठकीत गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. प्राथमिक चौकशीअंती रामानंदनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत १५ मे रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अजिंठा विश्रामगृह येथे विनापरवानगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला रावेर मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य २० ते २५ जणांची उपस्थिती होती.

बैठकीच्या आयोजनावर उपस्थित झाले होते प्रश्नचिन्ह -

कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांच्या गर्दीत बैठक घेतल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा याबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस प्रशासनाकडून दाखल झाली फिर्याद -

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस नाईक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.