ETV Bharat / state

Jalgaon Crime : बंदुकीचा धाक दाखवून बँक व्यवस्थापकाला जळगावात लुटले

सुनील पाढाळे हे कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकीवर जाताना अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग केला. पुढे सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. आणि दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याजवळ येऊन पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला.

Jalgaon Crime
Jalgaon Crime
author img

By

Published : Mar 23, 2022, 7:17 PM IST

जळगाव - जळगाव तालुक्यातील विटनेर रस्त्यावर डोक्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत खाजगी बँक व्यवस्थापककडून बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा एकुण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिली माहिती
सुनील शेषराव पाढाळे हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात एनबीएफसी या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून माध्यमातून बचत गटातून पैसे वसूलीचे काम करतात. सुनील पाढाळे हे कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकीवर जाताना अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग केला. पुढे सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. आणि दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याजवळ येऊन पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनीलला विरोध केला असता त्यातील एकाने पिस्तूलचा धाक दाखवत ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी त्यांचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.