ETV Bharat / state

जळगावात घरगुती कारणावरून पित्याने केली मुलीची हत्या

कोमल उर्फ परी संदीप चौधरी (वय 7, रा. हिरागौरी पार्क, जळगाव) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. तर संदीप यादवराव चौधरी (वय 33, रा. हिरागौरी पार्क, जळगाव) असे आरोपी पित्याचे नाव आहे.

father-murdered-his-daughter-in-jalgaon
मुलगी कोमल उर्फ परी चौधरी आणि आरोपी वडिल संदीप चौधरी
author img

By

Published : Jan 9, 2020, 11:11 PM IST

जळगाव - क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादात एका 7 वर्षीय चिमुरडीचा बळी गेल्याची संतापजनक घटना गुरुवारी जळगावात घडली. कौटुंबीक वादातून नराधम पित्याने आपल्या निष्पाप मुलीचा गळा आवळून खून करत तीचा मृतदेह गिरणा नदीकिनारी बांभोरी पुलाखाली टाकून दिला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

जळगावात घरगुती कारणावरून पित्याने केली मुलीची हत्या

कोमल उर्फ परी संदीप चौधरी (वय 7, रा. हिरागौरी पार्क, जळगाव) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. तर संदीप यादवराव चौधरी (वय 33, रा. हिरागौरी पार्क, जळगाव) असे आरोपी पित्याचे नाव आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पारोळा शहरातून अटक केली. संदीप व नयना चौधरी दाम्पत्याचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. संदीप चौधरी हा मूळचा अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने 3 वर्षांपूर्वी तो जळगावात स्थायिक झाला.

शहरातील एका दुकानावर आरोपी काम करत होता. चौधरी दाम्पत्यास कोमल ही एकुलती एक मुलगी होती. बुधवारी सायंकाळी 4 वाजता नयना चौधरी यांनी कोमलला परिसरातील क्लासमध्ये सोडले होते. यानंतर साडेचार वाजता संदीप चौधरी याने क्लासमध्ये जाऊन मुलीस ताब्यात घेतले. क्लासची वेळ संपल्यानंतर नयना नेहमीप्रमाणे कोमलला घेण्यासाठी गेल्या होत्या. कोमलला तिचे वडील घेऊन गेल्याची माहिती नयना यांना मिळाली. त्यांनी पतीस फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्याचा मोबाईल बंद होता. संदीप हा बुधवारी समर्थांच्या बैठकीस जात असे. त्यामुळे नयना यांनी रात्री 10 वाजेपर्यंत त्याची वाट पाहिली. तोपर्यंतही त्यांचा मोबाइल बंद होता. रात्र होऊनही दोघेही घरी न आल्याने नयना यांनी काही नातेवाईकांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. नंतर रात्रीच संदीप व कोमल यांचा शोध सुरू झाला.

गुरुवारी सकाळी 8 वाजता नयना चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तोपर्यंतही संदीपचा मोबाईल बंदच होता. याच दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजता संदीपने दुकान मालकास एक मेसेज केला. त्यात त्याने 'आपण मुलीचा खून केला असून तिचा मृतदेह बांभोरी पुलाखाली आहे. मी स्वत: देखील आत्महत्या करणार असून पारोळा याठिकाणी आहे.' असे म्हटले होते. हा मेसेज पाहून दुकान मालकाने थेट तालुका पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता कोमलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने तपास करून फरार संदीपच्या पारोळा शहरातून मुसक्या आवळल्या.

Intro:जळगाव
क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादात एका 7 वर्षीय चिमुरडीचा बळी गेल्याची संतापजनक घटना गुरुवारी जळगावात घडली आहे. कौटुंबीक वादातून नराधम पित्याने आपल्या निष्पाप मुलीचा गळा आवळून खून करत तिचा मृतदेह गिरणा नदीकिनारी बांभोरी पुलाखाली टाकून दिला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.Body:कोमल उर्फ परी संदीप चौधरी (वय 7, रा. हिरागौरी पार्क, जळगाव) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. तर संदीप यादवराव चौधरी (वय 33, रा. हिरागौरी पार्क, जळगाव) असे आरोपी पित्याचे नाव असून ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पारोळा शहरातून अटक केली. संदीप व नयना चौधरी दाम्पत्याचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. संदीप चौधरी हा मूळचा अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने 3 वर्षांपूर्वी तो जळगावात स्थायिक झाला. शहरातील एका दुकानावर ते काम करीत होता. चौधरी दाम्पत्यास कोमल ही एकुलती एक मुलगी होती. बुधवारी सायंकाळी 4 वाजता नयना चौधरी यांनी कोमलला परिसरातील क्लासमध्ये सोडले होते. यानंतर साडेचार वाजता संदीप चौधरी याने क्लासमध्ये जाऊन मुलीस ताब्यात घेेतले. क्लासची वेळ संपल्यानंतर नयना नेहमीप्रमाणे कोमलला घेण्यासाठी गेल्या होत्या. कोमलला तिचे वडील घेऊन गेल्याची माहिती नयना यांना मिळाली. त्यांनी पतीस फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्याचा मोबाईल बंद होता. संदीप हा बुधवारी समर्थांच्या बैठकीस जात असे. त्यामुळे नयना यांनी रात्री १० वाजेपर्यंत त्याची वाट पाहिली. तोपर्यंतही त्यांचा मोबाइल बंद होता. रात्र होऊनही दोघेही घरी न आल्याने नयना यांनी काही नातेवाईकांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. नंतर रात्रीच संदीप व कोमल यांना शोध सुरू झाला. गुरुवारी सकाळी ८ वाजता नयना चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तोपर्यंतही संदीपचा मोबाईल बंदच होता. याच दरम्यान, सकाळी ९.३० वाजता संदीपने दुकान मालकास एक मॅसेज केला. त्यात त्याने ''आपण मुलीचा खून केला असून तिचा मृतदेह बांभोरी पुलाखाली आहे. आता मी स्वत: देखील आत्महत्या करणार आहे. मी पारोळा येथे आहे'' असे म्हटले होते. हा मेसेज पाहून दुकान मालकाने थेट तालुका पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता खरच कोमलचा मृतदेह आढळून आला. यानंतर नयना चौधरी यांना माहिती देण्यात आली. दुपारी २.३० वाजता पंचनामा करुन कोमलचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला.Conclusion:नयना चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात संदीप चौधरीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मेसेजच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून फरार संदीपच्या पारोळा शहरातून मुसक्या आवळल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.