ETV Bharat / state

जळगावातील विद्यार्थ्याने विकसित केला शेतीची कामे करणारा रोबोट! - Jalgaon student made robot

सोहेल हमीद कच्छी असे रोबोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवासी आहे. भुसावळातील श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो संगणक शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

जळगावचा रोबोट
जळगावचा रोबोट
author img

By

Published : May 21, 2021, 4:15 PM IST

Updated : May 21, 2021, 4:33 PM IST

जळगाव - 'गरज ही शोधाची जननी आहे', ही म्हण जळगावातील एका विद्यार्थ्याने सिद्ध केली आहे. या विद्यार्थ्याने एक रोबोट विकसित केला आहे, जो बियाण्यांची लागवड, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे एवढेच नव्हे तर पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देणे, अशी शेतीची सारी कामे करू शकतो. सोहेल हमीद कच्छी असे रोबोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवासी आहे. भुसावळातील श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो संगणक शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्याने बनविलेला 'बॅटरीवरचा रोबोट' पोहोचविणार कोरोनाग्रस्तांना औषधे

अशी सुचली कल्पना

सोहेल कच्छी हा संगणक शाखेचा विद्यार्थी आहे. सॅनिटायझरचे महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वी त्याने 'ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सिंग मशीन' बनवले आहे. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी याच मशिनच्या धर्तीवर काहीतरी भन्नाट उपकरण विकसित करावे, हा विचार त्याच्या मनात आला. शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार केल्यावर रोबोटची कल्पना त्याला सुचली. ही कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवत शेतीची सर्व कामे करणारा 'ॲग्रोबॉट' नावाचा एक रोबोट विकसित केला.

जळगावचा रोबोट

कमी खर्चात बनवला रोबोट

सोहेलने ॲग्रोबॉट हा रोबोट अत्यंत कमी खर्चात बनवला आहे. यासाठी त्याने पीव्हीसी पाइपचे तुकडे, खेळण्यातील चाके, ड्राइव्ह मोटारी यासह इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल पार्टस तसेच उपकरणांचा वापर केला आहे. हा रोबोट बियाण्यांची लागवड करणे, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे, पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देणे अशी कामे तर करेलच, याशिवाय परिसराचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग अशा स्वरुपाची माहितीही शेतकऱ्यांना देईल. हा रोबोट एक प्रायमरी मॉडेल म्हणून विकसित केला आहे. भविष्यात या मॉडेलच्या माध्यमातून शेती उपयोगी यंत्र साकारता येऊ शकते.

हेही वाचा - Exclusive : कोविडच्या खात्म्यासाठी 'तारा' रोबोट तयार, शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून निर्मिती

तंत्रज्ञानाचा अभिनव वापर

ॲग्रोबॉट हा रोबोट तयार करताना सोहेलने तंत्रज्ञानाचा अभिनव वापर केला आहे. हा रोबोट एका ॲपच्या माध्यमातून ब्लूटूथ किंवा वायफायद्वारे मोबाइल, लॅपटॉप तसेच संगणकाला कनेक्ट होऊन ऑपरेट करता येतो. ऑपरेट करणारी व्यक्ती लांब रेंजमध्ये असेल तर वायफाय सर्व्हरद्वारे इंटरनेटवरून त्याला कुठूनही ऑपरेट करता येते. रिले इम्प्लिमेंट सर्किटच्या माध्यमातून शेतीला पाणी देणाऱ्या विद्युत मोटारीचे नियंत्रणही हा रोबोट सहज करू शकतो. यूट्यूब, इन्स्टाग्राम अशा साइट्सवरून युवा शेतकरी या रोबोटची कार्यप्रणाली आणि हाताळणी समजून घेऊ शकतात. भविष्यात या रोबोटमध्ये गरजेनुसार अजून अपडेशन करता येईल, असेही सोहलने सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मारली बाजी

वसई येथील विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट शोकेस कॉम्पिटिशन नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील 300 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सोहेलने बनवलेल्या रोबोटने कृषी गटातून पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कृषी सोबतच रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रीज अशा विविध गटात एकाहून एक सरस प्रोजेक्टचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल सोहेलचे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, सचिव एम. डी. शर्मा, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अॅकेडमिक डीन डॉ. आर. बी. बारजिभे, कॉम्प्यूटर सायन्सचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी कौतुक केले.

Last Updated : May 21, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.