ETV Bharat / state

जळगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकरी दांपत्याची आत्महत्या

दुष्काळामुळे शेतातून काहीही उत्पन्न मिळत नसल्याने पवार दांपत्य विवंचनेत होते. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून खूप हताश झाले होते. सततच्या नापिकीमुळे लोटन पवार यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, विकास कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच खासगी सावकाराचे मोठे कर्ज असल्याचे बोलले जात आहे.

लोटन पवार आणि सुनिता पवार
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:13 AM IST

जळगाव - सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून अमळनेर तालुक्यात असलेल्या पिळोदे गावातील एका तरुण शेतकरी दांपत्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लोटन रामराव पवार (वय ३५) तसेच सुनीता लोटन पवार (वय ३३) अशी आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावे आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. दुष्काळामुळे शेतातून काहीही उत्पन्न मिळत नसल्याने पवार दाम्पत्य विवंचनेत होते. या वर्षी पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून खूप हताश झाले होते. सततच्या नापिकीमुळे लोटन पवार यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, विकास कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच खासगी सावकाराचे मोठे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेतून या दांपत्याने टोकाचे पाऊल उचलले.

लोटन पवार यांच्याकडे अवघी आठ बिघे (सुमारे सात एकर) शेतजमीन आहे. अमळनेर तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीत टाकलेला खर्चही निघत नव्हता. आता पुन्हा कर्ज घेऊन पेरणी करणे अशक्य असल्याने पवार दांपत्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आठवीला तर लहान मुलगा चौथीला शिकत आहे. वृद्ध आई तसेच विधवा बहिणींची जबाबदारी पवार यांच्या खांद्यावर होती. या दुर्दैवी घटनेमुळे पिळोदे गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:जळगाव
सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या पिळोदे गावातील एका तरुण शेतकरी दाम्पत्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.Body:लोटन रामराव पवार (वय ३५) तसेच सुनीता लोटन पवार (वय ३३) अशी आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. दुष्काळामुळे शेतातून काहीही उत्पन्न मिळत नसल्याने पवार दाम्पत्य विवंचनेत होते. या वर्षी पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून खूप हताश झाले होते. सततच्या नापिकीमुळे लोटन पवार यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, विकास कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच खासगी सावकाराचे मोठे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या विवंचनेतून त्यांनी पत्नीसह टोकाचे पाऊल उचलले. Conclusion:लोटन पवार यांच्याकडे अवघी आठ बिघे शेतजमीन आहे. अमळनेर तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीत टाकलेला खर्चही निघत नव्हता. आता पुन्हा कर्ज घेऊन पेरणी करणे अशक्य असल्याने पवार दाम्पत्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा आठवीला तर लहान मुलगा चौथीला शिकत आहे. वृद्ध आई तसेच विधवा बहिणींची जबाबदारी पवार यांच्या खांद्यावर होती. या दुर्दैवी घटनेमुळे पिळोदे गावावर शोककळा पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.