ETV Bharat / state

एकनाथ शिंदेंचा जळगाव जिल्ह्यात गोपनीय दौरा; शिवसेनेचे नगरसेवक भाजपमध्ये स्वगृही परतल्याने नाराजी

author img

By

Published : Oct 19, 2021, 10:52 PM IST

मंत्री एकनाथ शिंदेंनी दौऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव महापालिकेतील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या मुद्द्यावरून ते चांगलेच नाराज झाले होते. उर्वरित नगरसेवकांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची? यासंदर्भात त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

जळगाव - राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत शिवसेनेकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. शिंदेंनी या दौऱ्यात पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेत सूत्रे हलवली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जळगाव महापालिकेतील बदललेली राजकीय परिस्थिती तसेच जिल्हा बँक निकडणुकीच्या अनुषंगाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या सोबत नियोजित बैठक घेतली. ते आढावा घेऊन पाचोऱ्यातूनच माघारी परतले. त्यांनी जळगावात येणे जाणीवपूर्वक टाळले.

हेही वाचा-कोरोनाचे नियम पाळून चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू होतील - मेघराज राजेभोसले

'हे' आहे दौऱ्याचे प्रमुख कारण-

जळगाव महापालिकेत 6 महिन्यांपूर्वी महापौर व उपमहापौर निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपचे 27 नगरसेवक गळाला लावून सत्ता काबीज केली होती. त्यानंतरही भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत आले होते. पण शिवसेनेत मुस्कटदाबी होत असल्याचे कारण देत भाजपच्या बंडखोर गटातील 12 नगरसेवक शिवसेना सोडून पुन्हा भाजपमध्ये स्वगृही परतले. त्यामुळे महापालिकेत भाजप बहुमतात तर शिवसेना अल्पमतात आली आहे. बंडखोर नगरसेवकांच्या गटाने दिलेल्या दणक्याने शिवसेना चांगलीच हादरली आहे. या विषयासंदर्भात स्थानिक नेतेमंडळींशी सल्लामसलत करण्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याची माहिती सत्राने दिली. जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने मातोश्रीवरून आलेल्या सूचना 'पास आऊट' करण्यासाठीही नगरविकास मंत्री शिंदे यांनी तातडीने जळगावचा दौरा केल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचा-पुण्यात खड्ड्यांच्या प्रश्नावरुन शिवसेना आक्रमक; खड्ड्यांना भाजपा नेत्यांचे नाव देत काढला 'बैलगाडी मोर्चा'

दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता-

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. शिंदे पाचोऱ्यात येणार असल्याने स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांना थेट तिकडेच येण्याच्या सूचना होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह जळगाव महापालिकेतील भाजपचे बंडखोर नगरसेवकदेखील पाचोऱ्यात गेलेले होते. दुपारनंतर एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत माहिती लीक झाली. मात्र, शिवसेनेच्या नेतेमंडळीने शिंदेंचा हा दौरा वैयक्तिक कारणास्तव असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

हेही वाचा-नवं हिंदू म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोणाला डिवचले? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार!

जळगाव महापालिकेतील राजकीय परिस्थितीवर चर्चा-

मंत्री एकनाथ शिंदेंनी दौऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव महापालिकेतील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या मुद्द्यावरून ते चांगलेच नाराज झाले होते. उर्वरित नगरसेवकांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची? यासंदर्भात त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केल्या आहेत. सद्यस्थितीत महापालिकेत महापौर व उपमहापौर असले तरी भाजपकडे बहुमत असल्याने ठराव मंजुरीत कसरत होईल, याबाबत पुढे काय करता येईल? याबाबतही त्यांनी स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा बँकेच्या भूमिकेविषयी केले मार्गदर्शन-

एकनाथ शिंदे यांनी आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुका तसेच जिल्हा बँक निवडणुकीविषयीदेखील काही मार्गदर्शन केल्याचे सूत्रांनी सांगितले. दौऱ्यातील बैठका घेतल्यावर ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या सस्पेन्स दौऱ्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.