ETV Bharat / state

Eknath Khadase On Chandrakant Patil : एकनाथ खडसे यांची चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे यांच्यावर टीका - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

'भाजपचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवतात, चंद्रकांत पाटील यांनी देखील अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिले आहेत. मात्र सर्व तारखा मागे निघून गेल्या असून चंद्रकांत पाटलांच्या नवीन तारखेची आम्ही वाट पाहत आहोत' अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ( Eknath Khadse On Chandrakant Patil ) केली आहे.

Eknath Khadase On Chandrakant Patil
एकनाथ खडसे
author img

By

Published : Mar 19, 2022, 4:33 PM IST

जळगाव - 'भाजपचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवतात, चंद्रकांत पाटील यांनी देखील अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिले आहेत. मात्र सर्व तारखा मागे निघून गेल्या असून चंद्रकांत पाटलांच्या नवीन तारखेची आम्ही वाट पाहत आहोत' अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ( Eknath Khadse On Chandrakant Patil ) केली आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील अनेक आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे, मात्र केवळ हे मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत असल्याचे प्रतिक्रिया देत रावसाहेब दानवे यांच्यावर देखील खडसेंनी निशाणा ( Eknath Khadse On raosaheb danve ) साधला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

'आम्ही सत्तेत येणाचे चित्र रंगवत आहेत'

मनसेपासून ते एमआयएमपर्यंत सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आगामी काळात आपणच सत्तेत येणार असल्याचे वक्तव्य करतात. तसेच चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे हेदेखील आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सत्तेवर येणार असल्याचे चित्र रंगवत असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

प्रवीण दरेकर यांना तूर्तास मिळालेल्या दिलासा बाबत

प्रवीण दरेकर यांच्या गुन्ह्याबाबत तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, मात्र गुन्हा खारीज झाला असा त्याचा अर्थ होत नाही. या प्रकरणात चौकशी अंती जे तथ्य समोर येईल. त्यावरून जी कार्यवाही व्हायची ती होईल, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Chandrakant Patil on MIM : एमआयएम महाविकास आघाडीसोबत गेला तरी काहीच फरक पडणार नाही - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.