जळगाव - भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली चौथी यादी जाहीर केली. या यादीतही एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे नाराज पुढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. खडसेंच्या जागी त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही
भाजपने एकनाथ खडसेंचा पत्ता कट केल्याचे या यादीतून दिसून येत आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. यापैकी एकातरी यादीत आपले नाव असेल, अशी आशा हेवीवेट नेते असलेलता खडसेंना होती. मात्र, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.
हेही वाचा - मिथुन चक्रवर्ती यांची संघ मुख्यालयाला भेट, कारण अद्यापही गुलदस्त्यात
दरम्यान, खडसेंच्या फार्म हाऊसवर समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. खडसेंऐवजी रोहिणी खडसेंचे नाव आल्याने समर्थक अवाक झाले आहेत. खडसेंच्या नावाला डावलल्याने पक्षाच्या भूमिकेविषयी देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. खडसे अद्याप फार्म हाऊसच्या आतमध्ये बसले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. माध्यमांना त्यांनी भेट नाकारली आहे. थोड्याच वेळात खडसे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.