ETV Bharat / state

गाफील राहू नका, कोरोनाला गांभीर्याने घ्या; कोरोनामुक्त झालेल्या रोहिणी खडसेंनी व्यक्त केली भावना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे या मंगळवारी दुपारी कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतल्या.

Rohini Khadse
रोहिणी खडसे यांची कोरोनावर मात
author img

By

Published : Nov 24, 2020, 4:49 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसे या मंगळवारी दुपारी कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतल्या. 'कोरोना हा गंभीर आजार आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला. कोरोनाविषयी गाफील राहू नका, त्याला गांभीर्याने घ्या. आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सर्वांनी नियम पाळायलाच हवेत. लहान मुलांना कोरोना होत नाही, हा गैरसमज आहे. म्हणून मुलांचीही काळजी घ्या', अशा शब्दांत अ‌ॅड. रोहिणी खडसेंनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोहिणी खडसे यांची कोरोनावर मात

अ‌ॅड. रोहिणी खडसेंना गेल्या आठवड्यात म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. ऍड. खडसे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले मुलगी सारा आणि मुलगा समरजित यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. म्हणून कोरोनाच्या उपचारासाठी त्या दोन्ही मुलांसह जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. 10 दिवसात त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे त्यांना आज दुपारी 2 वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राहत्या घरी झाले जल्लोषात स्वागत-

अ‌ॅड. रोहिणी खडसे तसेच त्यांच्या दोन्ही मुलांनी कोरोनावर मात केल्याने ते सर्व जण आपल्या जळगावातील घरी परतले. याठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी त्यांचे फुलांची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सर्वांनी आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, वेळोवेळी हात सॅनिटाईझ करणे, गर्दी टाळणे, गरजेवेळीच घराबाहेर पडणे, अशी नियमावली पाळावी, असे आवाहन केले.

एकनाथ खडसे मुंबईत-

अ‌ॅड. रोहिणी खडसे यांच्यानंतर एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने ते मुंबईत आहेत. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, सुरक्षित आहेत, अशी माहिती यावेळी रोहिणी खडसेंनी दिली.

हेही वाचा - ईडी काय इंटरपोलला आणा आम्ही घाबरत नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा

हेही वाचा - राज्यात लस वितरणासाठी टास्क फोर्सची स्थापना; पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.