ETV Bharat / state

नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात; गिरीश महाजनांची सावध प्रतिक्रिया - जळगावचे राजकारण

नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही एकमेकांची पाठराखण करतो. परंतु, माध्यमांना आमच्याविषयी भलतेच काहीतरी वाटत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकी निमित्त ते जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांनी सेल्फी प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची पाठराखण केल्या बद्दल प्रश्न केला. यावर मिश्किल हास्य करत त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली.

गिरीश महाजन
author img

By

Published : Aug 14, 2019, 7:33 PM IST

जळगाव- नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही एकमेकांची पाठराखण करतो. परंतु, माध्यमांना आमच्याविषयी भलतेच काहीतरी वाटत असते. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलेच झाले, अशी सावध प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात दिली.

माहिती देताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन

भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकी निमित्त ते जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांनी सेल्फी प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची पाठराखण केल्या बद्दल प्रश्न केला. यावर मिश्किल हास्य करत त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र, असे असताना महाजन यांनी सावध प्रतिक्रिया देत आमच्यात सारे काही आलबेल असल्याचे भासवले. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

पूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे गिरीश महाजन सर्वांच्या टीकेला धनी ठरले होते. मात्र त्यांच्या समर्थनार्थ एकनाथ खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया त्यावेळी खडसेंनी दिली होती. या विषयावर गिरीश महाजनांनी जाहीरपणे प्रतिक्रिया दिली. एरवी महाजन खडसेंच्या बाबतीत मोकळेपणाने प्रतिक्रिया देणे टाळतात. आज मात्र, त्यांनी खडसेंच्या बाबतीत मौन सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

येत्या 2 दिवसात कृत्रिम पावसाबाबत निर्णय होईल

मराठवाड्यात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने तेथे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील ९ ते १० धरणे कोरडीठाक आहेत. त्यामुळे मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात हालचाली देखील सुरू आहेत. नवे तंत्रज्ञान वापरून काही करता येईल का, याचा विचार आम्ही करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचा निर्णय झाला आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी असलेल्या नव्या तंत्रज्ञानाबाबत निविदा प्रक्रिया देखील झाली आहे. येत्या 2 दिवसात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती देखील जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून कर्ज घेणार

राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून पूर्वीच्या व्याज दराने कर्ज घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. यापूर्वी केंद्राच्या नाबार्डकडून सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेतले जात होते. परंतु, आता केंद्राच्या भरवश्यावर न राहता मोठ्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पाडळसरे प्रकल्प, हतनूर धरणाचे पाणी वळविण्याचा प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

विरोधकांना बोलायला काय लागते?

पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने केंद्राकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. ही मदत तुटपुंजी असून शासनाने सध्याच्या आकस्मिक निधीतून रक्कम काढून पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या विषयावरून गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पश्चिम महाराष्ट्रातील आपत्तीचा अभ्यास करूनच आम्ही केंद्राकडे मदत मागितली आहे. शेतीसाठी किती मदत द्यावी लागेल, नागरिकांना किती मदत करावी लागेल, याचा अंदाज घेऊनच आम्ही नियोजन केले आहे. मात्र, विरोधकांना बोलायला काय लागते? काहीही अभ्यास करायचा नाही, आणि वाट्टेल ते मागायचे, अशा शब्दांत महाजन यांनी विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला.

Intro:जळगाव
नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करत असतो. परंतु, माध्यमांना आमच्याविषयी भलतेच काहीतरी वाटत असते. नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली हे चांगलेच झाले, अशी सावध प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगावात दिली.Body:भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीनिमित्त ते जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांनी सेल्फी प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची पाठराखण करण्यावरून छेडले असता त्यांनी मिश्किल हास्य करत आपली प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. मात्र, असे असताना महाजन यांनी सावध प्रतिक्रिया देत आमच्यात सारे काही आलबेल असल्याचे भासवले. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे सर्वांच्या टीकेचे धनी ठरलेले गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ एकनाथ खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली होती. या विषयावर गिरीश महाजनांनी जाहीरपणे प्रतिक्रिया दिली. एरवी महाजन खडसेंच्या बाबतीत मोकळेपणाने प्रतिक्रिया देणे टाळतात. आज मात्र, त्यांनी खडसेंच्या बाबतीत मौन सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

येत्या 2 दिवसात कृत्रिम पावसाबाबत निर्णय होईल-

मराठवाड्यात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील 9 ते 10 धरणे कोरडीठाक आहेत. त्यामुळे मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात हालचाली देखील सुरू आहेत. नवे तंत्रज्ञान वापरून काही करता येईल का, याचा विचार आम्ही करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचा निर्णय झाला आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी असलेल्या नव्या तंत्रज्ञानाबाबत निविदा प्रक्रिया देखील झाली आहे. येत्या 2 दिवसात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती देखील जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून कर्ज घेणार-

राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून पूर्वीच्याच व्याज दराने कर्ज घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. यापूर्वी केंद्राच्या नाबार्डकडून सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेतले जात होते. परंतु, आता केंद्राच्या भरवश्यावर न राहता मोठ्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पाडळसरे प्रकल्प, हतनूर धरणाचे पाणी वळविण्याचा प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्याचेही महाजन म्हणाले.Conclusion:विरोधकांना बोलायला काय लागते?

पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने केंद्राकडे 6 हजार 800 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. ही मदत तुटपुंजी असून शासनाने सध्याच्या आकस्मिक निधीतून रक्कम काढून पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या विषयावरून गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पश्चिम महाराष्ट्रातील आपत्तीचा अभ्यास करूनच आम्ही केंद्राकडे मदत मागितली आहे. शेतीसाठी किती मदत द्यावी लागेल, नागरिकांना किती मदत करावी लागेल, याचा अंदाज घेऊनच आम्ही नियोजन केले आहे. मात्र, विरोधकांना बोलायला काय लागते? काहीही अभ्यास करायचा नाही, आणि वाट्टेल ते मागायचे, अशा शब्दांत महाजन यांनी विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.