ETV Bharat / state

जळगाव महापालिकेची उपमहापौर पदाची निवड होणार बिनविरोध ? शिवसेनेची तलवार म्यान

author img

By

Published : Nov 7, 2020, 6:34 PM IST

Updated : Nov 7, 2020, 7:15 PM IST

खडसेंच्या पक्षबदलानंतर शिवसेनेने देखील खडसेंशी जमवून घेतले आहे. जळगाव महापालिका स्थायी समिती सभापती निवडीच्या निमित्ताने शिवसेना नगरसेवकांनी खडसेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. मात्र, आता स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेल्या शिवसेनेने उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत विशेष रस घेतलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

उपमहापौर पदाची निवड बिनविरोध होणार
उपमहापौर पदाची निवड बिनविरोध होणार

जळगाव - महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेल्या शिवसेनेने उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत विशेष रस घेतलेला नाही. शिवसेनेने ऐनवेळी तलवार म्यान केल्याने ही निवडणूक बिनविराेध होऊन त्यात भाजप वरचढ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

माजीमंत्री एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर सगळ्यात जास्त चर्चा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जळगाव महापालिकेचा समावेश आहे. खडसेंच्या पक्षबदलानंतर शिवसेनेने देखील खडसेंशी जमवून घेतले आहे. जळगाव महापालिका स्थायी समिती सभापती निवडीच्या निमित्ताने शिवसेना नगरसेवकांनी खडसेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. त्यानंतर आता उपमहापौर पदाची निवड होत आहे. भाजपचे डाॅ. अश्विन साेनवणेंनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन उपमहापाैर निवडीसाठी ११ नोव्हेंबर राेजी विशेष महासभा आयाेजित केली आहे. यासाठी गुरुवारपासून (५ नोव्हेंबर) प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे गटनेते भगत बालाणी, उपगटनेते तथा सभापती राजेंद्र घुगे-पाटील व सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी नगरसचिव सुनील गाेराणे यांच्याकडून चार नामनिर्देशनपत्र घेतले आहेत. शिसेनेकडून मात्र, अद्याप नामनिर्देशनपत्र घेतलेले नाहीत.

उपमहापौर पदाची निवड होणार बिनविरोध
शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष-यापूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. निवडीच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपसमाेर आव्हान उभे केले हाेते. शिवसेनेकडे बहुमत नसले तरी भाजपच्या नाराजांना ऑफर देत सदस्य फाेडण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. तेव्हा ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी हाेणाऱ्या उपमहापाैरपदाच्या निवडीसाठी शिवसेना काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.

उपमहापाैरपदासाठी अवघ्या चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन महापाैर व उपमहापाैरांची निवड हाेणार आहे. कमी कालावधी मिळत असल्याने पक्षाची ताकद वाया न घालवता पुढच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यावर अधिक भर असल्याचे संकेत शिवसेनेच्या सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना उपमहापाैर निवडणुकीत आपला उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. असे झाल्यास उपमहापाैरपदी भाजपचा उमेदवार बिनविराेध निवडला जाण्याची शक्यता अधिक आहे.

उपमहापौर म्हणून सुनील खडकेंना संधी?

डाॅ. अश्विन साेनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या अकराव्या उपमहापाैर निवडीसाठी ११ नाेव्हेंबर राेजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयाेजन केले आहे.

महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपकडून प्रमुख पदांवरील पदाधिकाऱ्यांना एका वर्षासाठी संधी दिल्याचे सांगितले जात आहे. मार्च २०२१ मध्ये नवीन महापाैर व उपमहापाैर पदाची निवड हाेणार आहे. त्यामुळे नवीन उपमहापाैरांना केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. सुरुवातीपासून भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले सुनील खडके यांच्याच नावाची उपमहापौर पदासाठी चर्चा सुरू आहे. भाजप नेत्यांनी देखील त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे सांगितलेे जात आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामाेर्तब होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Nov 7, 2020, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.