जळगाव - किडनीच्या विकाराने त्रस्त रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तास डायलिसीसची सुविधा सुरू राहणार आहे.
डायलिसीस करण्याची सुविधा सुरू
वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा काेविड रुग्णालयासाठी अधिग्रहित केल्याने नाॅन काेविड रुग्णांची माेठ्या प्रमाणावर गैरसाेय झाली हाेती. गेल्या आठ दिवसांपूर्वी पुन्हा नाॅन काेविड सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यातील एक भाग असलेल्या किडनीच्या विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असणारी डायलिसीसची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पूर्वी मर्यादीत काळासाठी असलेली ही सुविधा यापुढे 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले आहेत.
दिवसाचे उद्दिष्ट 10 पर्यंत
नाॅन काेविड सुविधेसह आता डायलिसीसला सुरुवात झाली आहे. आठवडाभरात दिवसाला कमीत कमी तीन ते चार रुग्णांचे डायलिसीस करण्यात येत आहे. त्यात वाढ करून साधारणत: दिवसाला किमान 10 डायलेसीस करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे डाॅ. रामानंद यांनी सांगितले. या विभागाचे काम अधिक प्रभावीपणे हाेण्यासाठी अमित भंगाळे व डाॅ. शशिकांत गाजरे यांचे सहकार्य घेतले जातेय.
हेही वाचा - जम्मूमध्ये शस्त्रांसह दोन दहशतवाद्यांना अटक