ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Oct 14, 2020, 6:52 AM IST

जळगाव - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या 51 हजार 212 बाधित रुग्णांपैकी 47 हजार 396 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.55 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानकारक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय व आरोग्य यंत्रणांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतूक केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी नागरिकांनी जागरुक राहून शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात 12 ऑक्टोबर रोजी 243 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 47 हजार 396 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.55 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 587 अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 870 रुग्ण हे लक्षणे नसलेले तर, अवघे 717 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये 399 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 411, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 396 रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात 192 रुग्ण असून गृह अलगीकरणात 1 हजार 471 रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेबरोबरच रुग्णांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, उच्चदर्जाचे उपचार, नागरिकांचे समुपदेशन व जनजागृतीसह प्रशासनास लोकप्रतिनिधी व नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 हजार 854 बेड असून त्यापैकी 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेड असून 322 आयसीयु बेड निर्माण करण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजन वायु सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 350 इतकी असून आयसीयुमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 123 इतकी आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटी-पीसीआरद्वारे 99 हजार 708 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 25 हजार 787 अशा एकूण 2 लाख 25 हजार 495 संशयितांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. यापैकी 1 लाख 72 हजार 992 चाचण्या निगेटिव्ह तर 51 हजार 213 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 123 असून अवघे 167 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 230 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यु झालेल्या रुग्णांपैकी 1 हजार 79 रुग्ण हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 556 रुग्णांना जुने आजार (कोमॉर्बिड) होते. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.40 टक्क्यांपर्यंत खाली आला असून तो अजून कमी होण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.