ETV Bharat / state

Gurupushyamrut Yog : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांची मोठी गर्दी; भाव कमी झाल्याचा आनंद - Crowd for gold Purchase in Jalgaon Market

2 हजारांची नोट चलनातून बंद होणार असताना त्याचे विविध परिणाम बाजारपेठेवर होत आहे. 2 हजारांची नोट वापरण्याकरिता ग्राहकांनी सोने खरेदीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. तर आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठी गर्दी झाली होती.

Gurupushyamrut Yog
सोने खरेदीला ग्राहकांची मोठी गर्दी
author img

By

Published : May 25, 2023, 10:34 PM IST

माहिती देताना सोने व्यवसायिक

जळगाव: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराची नोट चलनातून काढण्याचा आदेश जारी केल्यानंतर सराफ व्यावसायिक भलतेच खूश झाले आहेत. कारण, 2 हजाराची नोट बदलण्यासाठी ग्राहकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम सराफा बाजारपेठेत सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अख्या राज्यात सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सोने बाजारात आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठी गर्दी झाली आहेत.

सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी: गेल्या तीन वेळेच्या गुरुपुष्यामृत योगाप्रमाणे या वेळीदेखील सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव हा आज 60 हजार 600 तर चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलो गेला आहे. यामुळे सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. दुसरीकडे दोन हजाराची नोट बंदी झाल्यावर ही नोट सुवर्ण बाजारात चालवून याचा उपयोग करून घेताना जळगाव येथील ग्राहक दिसून आले.

गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठी गर्दी होत आहे.दोन हजाराची नोट बंदी झाल्यावर ही नोट सुवर्ण बाजारात चालवून याचा उपयोग ग्राहक करत आहेत - सोने व्यवसायिक

दरात 2 हजार रुपयांची घसरण: पाच दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता जळगावात दोन दिवसांत 2 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 71 हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सोन्याच्या भावातही दोन दिवसांत 1 हजार रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार 6०० रुपये प्रति तोळ्यावर आले. मे महिन्याच्या सुरुवातीपासून चांदीच्या भावात वाढ होत आहे, यामध्ये १४ एप्रिल रोजी ती ७७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. दोन वर्षे आठ महिन्यांनंतर चांदीने हा पल्ला पुन्हा एकदा गाठला होता. तर आज जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने चांदीची मोठी उलाढाल झाली. तर सराफ व्यवसायिकांमध्ये मोठा आनंद पावहावयास मिळत आहे. तर गुरुपुष्प अमृत योगानिमित्त ग्राहकांची ही सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

सोन्याच्या भावातही दोन दिवसांत 1 हजार रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार 6०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गुरुपुष्यामृत योगामुळे सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. सोन्याचा भाव हा आज 60 हजार 600 तर चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलो गेला आहे. - सोने व्यवसायिक

हेही वाचा -

  1. Rs 2000 Note Withdrawal 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय चांदी
  2. Gold Silver Market दोन हजार रुपये नोटबंदीनंतर ग्राहकांचा सोनेचांदी खरेदीकडे कल
  3. Today Petrol Diesel Rates वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी पेट्रोल डिझेल भाजीपाला व सोने चांदीचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.