ETV Bharat / state

अवकाळी पावसाने शेती 'पाण्यात'; गिरणा धरणातून विसर्ग सुरू

author img

By

Published : Nov 2, 2019, 2:35 PM IST

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यामध्ये सर्वाधिक कापसाचे नुकसान झाल्याने जवळपास 5 लाख 5 हजार 877 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

जळगाव - अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. एकूण 15 तालुक्यातील 1 हजार 468 गावांमधील जवळपास 5 लाख 99 हजार 830 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक कापसाचे नुकसान झाल्याने जवळपास 5 लाख 5 हजार 877 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक पिकांचे नुकसान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात झाले. या तालुक्यात 85 हजार 166 हजार हेक्टर क्षेत्र पाऊस बाधित आहे.

खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाचे पीक या अवकाळी पावसामुळे हातून गेले असून, 3 लाख 17 हजार 893 हेक्टर क्षेत्रावरील कापसाच्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे ज्वारी - 38 हजार 288 हेक्टर, बाजरी - 8 हजार 769 हेक्टर, मका - 77 हजार 356 हेक्टर, सोयाबीन - 17 हजार 101 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे.

गिरणा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग

पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने शनिवारी(दि.2नोव्हेंबर) सकाळी साडेसहाच्या दरम्यान गिरणा धरणातून 52 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसामुळे गिरणा धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ होत असून, नदीत गिरणा, मन्याड व इतर नद्या-नाले असे एकूण 70 हजार क्युसेक पाणी जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. या आठवड्यात दोन ते तीन दिवसांच्या उघडीप नंतर शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 6 लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान हे कापसाचे झाले आहे.Body:चालू आठवड्यात पावसाचा खंड पडून सूर्यदर्शन झाले होते. परंतु, रात्रीपासून पुन्हा पाऊस पडत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 1 हजार 468 गावांमधील सुमारे 5 लाख 99 हजार 830 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसामुळे सुमारे 5 लाख 5 हजार 877 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात झाले आहे. जामनेर तालुक्यात 85 हजार 166 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाचे पीक या अवकाळी पावसामुळे हातून गेले आहे. जिल्ह्यातील 3 लाख 17 हजार 893 हेक्टर क्षेत्रावरील कापसाच्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे खरीप ज्वारी 38 हजार 288 हेक्टर, बाजरी 8 हजार 769 हेक्टर, मका 77 हजार 356 हेक्टर, सोयाबीन 17 हजार 101 हेक्टरवरील नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे.Conclusion:गिरणा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग-

पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने शनिवारी सकाळी साडेसहा वाजता गिरणा धरणातून 52 हजार 500 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. पावसामुळे गिरणा धरणातील पाण्याच्या विसर्गात निरंतन वाढ होत आहे. गिरणा नदीत गिरणा, मन्याड व इतर नदी नाले असे एकूण 70 हजार क्युसेस पाणी येऊ शकते. त्यामुळे गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.