ETV Bharat / state

जळगाव महापालिकेच्या घनकचरा निधीत भ्रष्टाचार, शिवसेनेकडून पालकमंत्र्यांना निवेदन - घनकचरा निधीत भ्रष्टाचार, जळगाव

महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि औरंगाबाद येथील लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनी यांनी संगनमताने घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शुक्रवारी निवेदन दिले.

Corruption in Jalgaon Municipal Corporation news
शिवसेनेकडून पालकमंत्र्यांना निवेदन
author img

By

Published : Nov 6, 2020, 7:47 PM IST

जळगाव - महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि औरंगाबाद येथील लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनी यांनी संगनमताने घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शुक्रवारी निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे आणि विलास भदाणे यांची देखील उपस्थिती होती.

घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत प्राप्त निधीचा समावेश डीपीआरमध्ये वाढीव बाब म्हणून समाविष्ट केला नाही. तसेच निविदा न काढता तब्बल 90 लाख रुपयांची कामे परस्पर करण्यात आली. असा आरोप गुरुवारी प्रशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याबाबतची कागदपत्रे देखील नाईक यांनी पत्रकार परिषदेत सादर केली होती. आज त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. तसेच त्यांनी 'निरी'कडे देखील याबाबत तक्रार दाखल केली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यावर, गुलाबराव पाटील यांनी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करून, दोषींवर योग्य ती कारवाई करू, असंही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.