ETV Bharat / state

जळगावात कोरोना लसीकरणासाठी वशिलेबाजी; आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर दिली नातेवाईकांना लस? - जळगाव कोरोना लेटेस्ट न्यूज

कोरोनाची लस घेण्यासाठी विविध रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे मात्र, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी वशिलेबाजी करत, चक्क त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य केंद्राबाहेर रस्त्यावर कारमध्ये लस दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर दिली नातेवाईकांना लस?

author img

By

Published : Apr 30, 2021, 8:16 PM IST

जळगाव - कोरोनाची लस घेण्यासाठी विविध रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे मात्र, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी वशिलेबाजी करत, चक्क त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य केंद्राबाहेर रस्त्यावर कारमध्ये लस दिली. हा प्रकार काही तरुणांच्या सतर्कतेने उघड झाला. त्यानंतर लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. दरम्यान, लसीकरणाच्या प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला दररोज ११० डोस दिले जात आहेत. मात्र, या ठिकाणी दररोज ३०० हून अधिक नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील सकाळपासून नागरिकांची गर्दी झाली होती. याठिकाणी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर दिली नातेवाईकांना लस?

नातेवाईकांना लस दिली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा

शुक्रवारी सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असताना, गावाच्या बाहेर रस्त्यावर काही कर्मचारी त्यांच्या नातेवाईकांना लस देत असल्याची माहिती गावातील तरुणांना मिळाली होती. म्हणून तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याठिकाणी आरोग्य केंद्राचे कर्मचारी आढळून आले. तरुणांनी त्यांना जाब विचारला, पण ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. आम्ही केवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांना लस दिली नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आरोग्य केंद्रातून लसीचे दोन व्हायल्स गायब?

या प्रकारानंतर कर्मचारी आरोग्य केंद्रात आले. त्यांच्या पाठोपाठ तरुण देखील त्या ठिकाणी दाखल झालेत. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत धारेवर धरले. मात्र, कर्मचारी आपण बाहेर लस दिली नसल्याच्या मुद्द्यावर ठाम होते. म्हणून आरोग्य केंद्रात आज किती लसी आल्या आणि शिल्लक किती आहेत, याची पडताळणी करण्याची विनंती तरुणांनी केली. तेव्हा लसीचे दोन व्हायल्स कमी. आढळल्याचा दावा तरुणांनी केला आहे. दरम्यान या प्रकारासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

गावपुढाऱ्यांचे लपून-छपून लसीकरण?

नागरिकांचा गोंधळ वाढतच जात असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झालेल्या गोंधळाबाबत तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. काही वेळेनंतर आरोग्य केंद्रात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहून देखील लस मिळत नाही. मात्र, दुसरीकडे वशिला लावून गावपुढार्‍यांना लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.

रुग्णालयात गैरप्रकार झाला नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

काही नागरिकांच्या गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी हे किनोद या गावाला जात होते. त्यात काही नागरिकांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी थांबवले होते. मात्र, काहींनी याबाबत गैर अर्थ काढल्याने हा वाद निर्माण झाला. कोणताही गैरप्रकार या ठिकाणी घडलेल्या नाही, असा खुलासा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम. एन. पेशट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा - केंद्र सरकार 4,50,000 रेमडेसिवीर इंजेक्शनची करणार आयात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.