जळगाव - देशसेवेसाठी जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे तैनात असताना सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, वीरजवान अमित पाटील यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करुन शोक व्यक्त केला.
जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना वाकडी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पाटील यांना 16 डिसेंबर रोजी वीरगती प्राप्त झाली. आज पालकमंत्री पाटील यांनी वीरजवान अमित पाटील यांच्या मुळगावी वाकडी येथील घरी जाऊन त्यांचे वडिल साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशालीताई पाटील, भाऊ, बहिण व मुलांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.
कुटुंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करणार-
वीरजवान अमित पाटील यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाणार नाही, अशा भावना पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. वीरजवान अमित पाटील यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे पाटील म्हणाले. यावेळी महेंद्र पाटील, रमेश पाटील, दिलीप घोरपडे, नानाभाऊ कुमावत, भावडू गायकवाड, नकुल पाटील, मोती आप्पा पाटील, निलेश गायके, वसीम चेअरमन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा- शौर्यदिन कोरोनाचे नियम पाळून नीट व शांततेत साजरा करा - आनंदराज आंबेडकर