जळगाव- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात तुफान बॅटिंग केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना भाजप एक क्रमांकाचा पक्ष झाला आहे. हे झाँकी आहे, जिल्हापरिषद, महापालिका निवडणुका बाकी आहेत. आम्ही लोकांचे काम करत आहोत. सर्व समाजाला घेऊन पुढे जात आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की पुढची २५ वर्षे कोण ठरविणार भविष्य? हे जनता ठरविणार आहे. अडीच वर्षात एवढे काम केले ग्रामपंचायत निवडणुकीत पोचपावती दिली आहे. असे काम करू दुसऱ्या पक्षाचे नाव येणार नाही. गुलाबराव पाटील यांनी २२ हजार योजनांच्या मंजूर केल्या आहेत. मोदी सरकारने एकदाच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. त्यांच्याबरोबर पुढे जायचे नाही का? आम्ही विकासाचा सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत. प्रगतीचा मार्ग सोडणार नाही. बाळासाहेबांच्या विचार सोडणार नाही, प्रतारणा करणार नाही. खरी गद्दारी कुणी केली हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे.