ETV Bharat / state

रासायनिक तसेच सेंद्रीय शेतीमुळे सजीवसृष्टी नष्ट होईल - डॉ. सुभाष पाळेकर - Food

नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत तर होते. त्यातून उत्पादित होणारे अन्न हे मानवी शरीरासाठी अमृतासमान असते. हे अन्न ग्रहण केले तर निरोगी जीवनशैली जगता येते, असे डॉ.पाळेकर यांनी सांगितले.

डॉ. सुभाष पाळेकर
author img

By

Published : Jul 28, 2019, 9:36 PM IST

जळगाव - 'रासायनिक शेतीमुळे मातीतील उपयुक्त जिवाणू नष्ट होत आहेत. सेंद्रीय शेतीमुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाणापेक्षा जास्त उत्सर्जन होत आहे. या दोन्ही बाबींमुळे पर्यावरणाचा समतोल ढासाळला असून अन्नसाखळी धोक्यात आली आहे. हा प्रकार अजून काही वर्षे असाच सुरू राहिला तर सजीवसृष्टी नष्ट होईल,' अशी भीती नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केली.

डॉ. सुभाष पाळेकर

जळगाव जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे रविवारी 'चला जाऊ परत निसर्गाकडे' या विषयावर एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेला राज्यभरातून शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, 'सेंद्रीय शेतीमुळे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होऊन तापमान वाढ आणि प्रदूषण होते,' असा दावा त्यांनी केला.

विषयुक्त अन्न, अशुद्ध हवा व पाण्यामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांची माहिती डॉ. पाळेकर यांनी दिली. नैसर्गिक शेतीचे महत्त्व तसेच घराचे छत किंवा गच्चीवर विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा, याबाबत त्यांनी माहिती दिली. निसर्गपूजा हीच खरी ईश्वरपूजा आहे, असेही ते म्हणाले. आज मानवासमोर ज्या जटिल निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्व समस्या मानवनिर्मितच आहेत. त्यांच्यावर मात करायची असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत तर होते. त्यातून उत्पादित होणारे अन्न हे मानवी शरीरासाठी अमृतासमान असते. हे अन्न ग्रहण केले तर निरोगी जीवनशैली जगता येते, असे त्यांनी सांगितले.

रासायनिक शेतीत युरिया टाकला जातो. हा घातक युरिया पुढे विविध प्रक्रियेद्वारे फळे, भाजीपाला, धान्यात जाऊन त्याद्वारे आपल्या पोटात जातो. घरी भाजीपाला आणून धुतला तरी त्यातील विषारी घटक नष्ट होत नाही. सेंद्रीय शेतीच्या उत्पादनात कॅडमियम, शिसे, पारा, आर्सेनिक असे घटक असतात. यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल इनबॅलन्सची समस्या जाणवते. रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे मानवासह पशुपक्षी, जिवाणू यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. रासायनिक व सेंद्रीय शेतीमुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूमुळे वैश्विक तापमानवाढ होत आहे. अन्न व पाण्यात कीटकनाशकांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, वंध्यत्व हृदयविकार, कर्करोग असे असाध्य आजार वाढले आहेत, असेही डॉ. पाळेकर म्हणाले.

नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण-
घराच्या गच्चीवर कशाप्रकारे नैसर्गिक बाग फुलवावी, या विषयी डॉ. पाळेकर यांनी माहिती दिली. आपल्याला नैसर्गिक अन्नधान्य, भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने परसबागेत, घराच्या गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. गच्चीवर कशा प्रकारे वाफे, नर्सरी, माती तयार करावी, भाजीपाला लागवड कशी करावी, जीवामृत, घनजीवामृत व नैसर्गिक कीटकनाशके घरी कसे बनवावेत, याचे प्रशिक्षण देखील डॉ. पाळेकर यांनी यावेळी दिले.

Intro:जळगाव
रासायनिक शेतीमुळे मातीतील उपयुक्त जिवाणू नष्ट होत आहेत. तर सेंद्रीय शेतीमुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाणापेक्षा जास्त उत्सर्जन होत आहे. या दोन्ही बाबींमुळे पर्यावरणाचा समतोल ढासाळला असून अन्नसाखळी धोक्यात आली आहे. हा प्रकार अजून काही वर्षे असाच सुरू राहिला तर सजीवसृष्टी नष्ट होईल, अशी भीती नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते तथा पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केली.Body:जळगाव जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे रविवारी जळगावात 'चला जाऊ परत निसर्गाकडे' या विषयावर एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेला राज्यभरातून शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. पाळेकर यांनी विषयुक्त अन्न, अशुद्ध हवा व पाण्यामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम, नैसर्गिक शेतीचे महत्त्व तसेच घराचे छत किंवा गच्चीवर विषमुक्त भाजीपाला कसा पिकवावा, याबाबत माहिती दिली. डॉ. पाळेकर पुढे म्हणाले की निसर्गपूजा हीच खरी ईश्वरपूजा आहे. आज मानवासमोर ज्या जटील निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्व समस्या मानवनिर्मितच आहेत. त्यांच्यावर मात करायची असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत तर होते; शिवाय त्यातून उत्पादित होणारे अन्न हे मानवी शरीरासाठी अमृतासमान असते. हे अन्न ग्रहण केले तर निरोगी जीवनशैली जगता येते, असे त्यांनी सांगितले.

रासायनिक शेतीत युरिया टाकला जातो. हा घातक युरिया पुढे विविध प्रक्रियेद्वारे फळे, भाजीपाला, धान्यात जाऊन त्याद्वारे आपल्या पोटात जातो. घरी भाजीपाला आणून धुतला तरी त्यातील विषारी घटक नष्ट होत नाही. तसेच सेंद्रीय शेतीच्या उत्पादनात कॅडमियम, शिसे, पारा, आर्सेनिक असे घटक असतात. यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल इनबॅलन्सची समस्या जाणवते. रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे मानवासह पशुपक्षी, जिवाणू यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. रासायनिक व सेंद्रीय शेतीमुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूमुळे वैश्विक तापमानवाढ होत आहे. अन्नात व पाण्यात कीटकनाशकांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, वंध्यत्व हृदयविकार, कर्करोग असे असाध्य आजार वाढले आहेत, असेही डॉ. पाळेकर म्हणाले.Conclusion:नैसर्गिक शेतीचे दिले प्रात्यक्षिक-

घराच्या गच्चीवर कशाप्रकारे नैसर्गिक बाग फुलवावी, या विषयी डॉ. पाळेकर यांनी माहिती दिली. आज आपल्याला नैसर्गिक अन्नधान्य, भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने परसबागेत, घराच्या गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. गच्चीवर कशा प्रकारे वाफे, नर्सरी, माती तयार करावी, भाजीपाला लागवड कशी करावी, जीवामृत, घनजीवामृत व नैसर्गिक कीटकनाशके घरी कसे बनवावेत, याचे प्रशिक्षण देखील डॉ. पाळेकर यांनी यावेळी दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.