ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय करणे भोवले; तीन हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल

अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मुरली मनोहर, नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटेल, कालिंका माता चौकातील श्री गुरू रामदाणी फॅमिली रेस्टॉरंट हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करून कारवाईचे आदेश दिले.

तीन हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल
तीन हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल
author img

By

Published : Jun 1, 2020, 8:30 PM IST

जळगाव - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळातही रविवारी रात्री १० वाजता शहरातील काही हॉटेल सुरू असल्याचे समोर आले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या पाहणीतून हा प्रकार उघडकीस आला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या हॉटेल चालकांवर कारवाई केली आहे. यात हॉटेल मालकांसोबतच कारागिरांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मुरली मनोहर, नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटेल, कालिंका माता चौकातील श्री गुरू रामदाणी फॅमिली रेस्टॉरंट हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करून कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथक घटनास्थळी गेले असता हॉटेल सुरू असल्याचे दिसून आले.

या प्रकरणी हॉटेल मुरली मनोहरचे व्यवस्थापक लक्ष्मीनारायण चिरंजीवलाल उपाध्याय (रा. गणपतीनगर), हॉटेलचे कारागीर सुभाष पंडितराव महाजन, दयाकिसन पुरुषोत्तम भाट, मोहन भगवान सोनवणे, सोनुकुमार दिपासिंग, प्रेम वल्लभ जोशी तर, हॉटेल नारखेडेचे व्यवस्थापक नीलेश प्रकाश भावसार (रा. कासमवाडी), सुनील भागवत मराठे तसेच श्री गुरू रामदाणी फॅमिली रेस्टॉरंट व्यवस्थापक जसप्रीतसिंग केवलसिंग सहानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.