ETV Bharat / state

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंनी दिले 'हे' उत्तर! - एकनाथ खडसे लेटेस्ट न्यूज

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स, असे उत्तर देत या विषयाचे खडसे यांनी खंडन केले आहे. तसेच माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

eknath khadse
एकनाथ खडसे, भाजप नेते
author img

By

Published : Oct 16, 2020, 5:51 PM IST

जळगाव - भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून, ते उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आज दुपारी जळगावात असताना खडसेंनी 'राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स' असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. 'माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत', असेही ते यावेळी म्हणाले.

एकनाथ खडसे, भाजप नेते

हेही वाचा - पंढरपुरात पूरपरिस्थिती, 8 हजार कुटुंबांना हलवले सुरक्षितस्थळी

शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आलेले होते. आपल्या निवासस्थानी असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले.

बोरखेड्यातील घटना दुर्दैवी-

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या निर्घृण हत्येच्या घटनेसंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी देखील खडसेंनी केली.

हेही वाचा - ईटीव्ही भारत स्पेशल : गडचिरोलीत ऑनलाइन शिक्षण 'नॉट रिचेबल'; भिंती देतात विद्यार्थ्यांना धडे

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी-

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत मी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण काहीएक उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असा आरोपही खडसेंनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.