ETV Bharat / state

मृत्यू झालेल्यांचे आकडे जाहीर करणारे हे ठाकरे सरकार, त्यातही लपवाछपवी असते; आशिष शेलारांची घणाघाती टीका - राज्य सरकारवर आशिष शेलारांची टीका

कोरोनाचे संकट असो की वादळ, पूर यासारखी आपत्ती असो; राज्यातील ठाकरे सरकारने शेतकरी किंवा सर्वसामान्य माणसाला जगवण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत. दुर्दैवाने ज्यांचे मृत्यू झाले, त्यांचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे. जे आकडे हे सरकार जाहीर करते, त्यात पण लपवाछपवी असते, अशी घणाघाती टीका करत भाजपा नेते ॲड. आशिष शेलार यांनी आज जळगावात ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

भाजप नेते आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार
author img

By

Published : Aug 4, 2021, 7:42 PM IST

जळगाव - कोरोनाचे संकट असो की वादळ, पूर यासारखी आपत्ती असो; राज्यातील ठाकरे सरकारने शेतकरी किंवा सर्वसामान्य माणसाला जगवण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत. दुर्दैवाने ज्यांचे मृत्यू झाले, त्यांचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे. जे आकडे हे सरकार जाहीर करते, त्यात पण लपवाछपवी असते, अशी घणाघाती टीका करत भाजपा नेते ॲड. आशिष शेलार यांनी आज जळगावात ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

मृत्यू झालेल्यांचे आकडे जाहीर करणारे हे ठाकरे सरकार, त्यातही लपवाछपवी असते; आशिष शेलारांची घणाघाती टीका

उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले ॲड. आशिष शेलार हे बुधवारी दुपारी जळगावात आले होते. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष पोपट भोळे आदींची उपस्थिती होती.

राज्य सरकारचे खान्देशकडे सपशेल दुर्लक्ष -
यावेळी ॲड. शेलार पुढे म्हणाले की, राज्य सरकारचे खान्देशकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असताना माहिती मिळाली की, खान्देशात सुमारे 10 हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. केवळ घोषणाबाजी आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

खडसेंना लगावला टोला; म्हणाले भाजपा सोडून गेलेल्यांची होते दुर्गती-
यावेळी ॲड. शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना पक्षांतराच्या मुद्द्यावरून टोला लगावला. 'एकनाथ खडसे यांचा विषय जुना झाला आहे. त्‍यांच्‍यावर मी आता बोलत नाही. मात्र, ज्यांनी भाजप सोडला, त्यांची दुर्गतीच झाली आहे. एखादे मोठे झाड पडले की त्याच्या आजूबाजूला पडझड होतेच. पण ती तात्कालिक असते. येत्या निवडणुकांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही शेलार म्हटले. आमदार गिरीश महाजन यांना डावलले जात असल्‍याच्या मुद्यावर बोलताना आमदार शेलार म्हणाले की, आमदार महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाचा नाही. राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

अनिल परब यांना काढला चिमटा-
राज्‍याचे परिवहन मंत्री असलेले अनिल परब यांनाही ॲड. शेलार यांनी चिमटा काढला. राज्यात परिवहन मंत्री आहेत का? हा प्रश्न आहे. परब हे एका परिवाराचे मंत्री झाले आहेत, अशी टीका शेलार यांनी केली. राज्यात सर्वत्र जुन्‍या बस चालविल्‍या जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. असा एसटी महामंडळांचा भोंगळ कारभार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

नवाब मलिक हे मालकाने दिलेली स्क्रिप्ट वाचतात-
राज्यपालांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना लक्ष्य करताना ते म्हणाले, नवाब मलिक हे त्यांच्या मालकाने लिहिलेली स्क्रिप्ट वाचतात. त्यांनी नीट अभ्यास करावा. राज्यपाल हे कुलपती म्हणून विद्यापीठांना भेटी-गाठी देत असतात. त्यात चुकीचे काय आहे. राज्यपाल हे कर्तव्याधिन काम करत असताना यांना अडचण का होते? कोरोनाच्या काळात त्या-त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना राज्यपालांनी माहिती विचारली तर यांच्या पायाखालची वाळू का सरकते? त्यात लपवण्यासारखं काय आहे? नवाब मलिक हे गैरजबाबदारीचे विधान करून माहिती लपवत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - राज्यपालांचा मराठवाडा दौरा; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्षाची ठिणगी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.