ETV Bharat / state

जळगाव : अवैध गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्यांची झाडाझडती - jalgaon latest news

अवैध गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या १७ जणांची झाडाझडती घेतली. हे सर्व १७ जण सध्या काय करतात, त्यांची उत्पन्नाची साधने काय याबाबत माहिती घेण्यात आली.

bhusawal police check those carrying illegal pistols
जळगाव : अवैध गावठी पिस्तुल बाळगणार्‍यांची भुसावळ पोलिसांनी घेतली झाडाझडती
author img

By

Published : Dec 27, 2020, 3:15 PM IST

जळगाव - भुसावळ शहरातील एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए लावल्यानंतर पोलीस प्रशासनाने अवैध गावठी पिस्तुली बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्यांची झाडाझडती घेतली.

गुन्हेगारीचा बिमोड करणार -

सोमनाथ वाघचौरे यांची डीवायएसपीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने अलीकडेच एका गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. तर अन्य गुन्हेगारांवरही हद्दपारी आणि एमपीडीएचे प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

१७ जणांची झाडाझडती -

दरम्यान, पोलिसांनी अवैध गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या १७ जणांची झाडाझडती घेतली. हे सर्व १७ जण सध्या काय करतात, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन व उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे, त्यांचा परिवाराचे पालन पोषण कसे होत आहे, याची माहिती घेण्यात आली. यातून काही नवीन बाबींचे आकलन होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - परदेशातून आलेल्या ४, ५५३ पैकी ३, १५५ प्रवासी मुंबईत क्वारंटाइन तर ३१६ प्रवाशांना सूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.